Middle East war, Iran conflict : Saam Tv
देश विदेश

युद्ध सुरुच राहणार, ट्रम्प यांच्याकडून युद्धविराम नाहीच, इराणवर आणखी भीषण हल्ल्यांचा इशारा

Middle East war, Iran conflict : मध्य पूर्वेतील युद्ध आणखी तीव्र होणार का? डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर नव्या हल्ल्यांचा इशारा दिला असून युद्धविरामाबाबत स्पष्ट नकार दिला आहे. जागतिक तेल संकट आणि वाढत्या तणावाची संपूर्ण माहिती वाचा.

Namdeo Kumbhar

गिरीष निकम -

Donald Trump statement, ceasefire update : आखाती देशातील युद्धाची झळ सर्वसामान्यांना बसतेय. त्यामुळे युद्धविराम कधी होणार ? याकडे जगाचे डोळे लागलेत. ट्रम्प यांनी अमेरीकेला संबोधीत करताना काय म्हटलंय ? एक महिन्यानंतर तरी इराणवरील हल्ले थांबणार का? पाहूया एक रिपोर्ट...

मध्य-पूर्वेतील युद्धाला एक महिना होऊन गेला तरी युद्धविरामाच्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. आखाती देशातील युद्धामुळे जगाची इंधनकोंडी झाली आहे. सर्वसामान्यांना युद्धाच्या झळा बसतायेत. अशा स्थितीत अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम यांचा इराण विरोधातला हेका कायम आहे. इरणाचे सैन्य आता अमेरिकेच्या नित्रंयणाखाली असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.आखाती युद्धात अमेरिकेचा विजय झाला अशी घोषणाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी अमेरिकेला संबोधित केलंय. इराणवर दोन ते तीन आठवड्यांत भीषण हल्ल्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

दुसरीकडे तेल संकटाचं कारण बनलेल्या होर्मुझ जलमार्गावर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलंय. अमेरिकेला होर्मुझची गरज नाही. जगातील ज्या देशांना होर्मुझच्या जलमार्गातून तेलाचा पुरवठा होतो, त्या देशांनी त्या मार्गाची काळजी घेतली पाहिजे असं डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत. आम्ही इराणमधून बाहेर पडणार आहोत आणि ही प्रक्रिया येत्या 2 ते 3 आठवड्यांत पूर्ण होईल, हे आश्वासन ट्रम्प यांनी पाळले नाही. ट्रम्प सातत्याने भूमिका बदलत आहेत. त्यामुळे अनेक राष्ट्रांचा त्यांच्यावर विश्वास उरला नाही. नाटो सदस्य देशांचेही त्यांना सहकार्य मिळत नाही. खुद्द अमेरीकेतच 'नो किंग्ज' या आंदोलनातून लाखो नागरिकांनी रस्त्यावर उतरुन ट्रम्प यांना आणि युद्धाला विरोध केलाय. तरीही युद्धखोर ट्रम्प हल्ल्याची तलवार म्यान करायला तयार नाहीत. त्यामुळे मध्य-पूर्वेत शांतता कधी नांदणार? याकडे जगाचं लक्ष लागलंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, झोपेत असताना डोक्यात सिलिंडर टाकला

Cloudburst : गावे पाण्याखाली, हायवेवरील पूल वाहून गेला; अरुणाचल प्रदेशात ढगफुटीसदृश्य पावसाचा रुद्रावतार, VIDEO

Thane News : ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 48 तास बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Maharashtra News Live Update: सोयगावच्या जरंडी परिसरात दीड तास ढगफुटी सदृश्य पाऊस; नदी- नाल्यांना पूर

Lohagad Tourism : पावसाच्या सरींमध्ये खुलणारे लोहगडचे सौंदर्य, जवळच आहेत 'हे' ५ सुंदर पिकनिक स्पॉट्स

SCROLL FOR NEXT