Russia-Ukraine War Saam Tv
देश विदेश

Russia-Ukraine War: युक्रेनमधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना एनएमसीने दिली दिलासा

रशिया- युक्रेन युध्दामुळे भारतीय विद्यार्थ्यांना इंटर्नशिप सोडून देशात परत यावे लागले आहे.

साम वृत्तसंथा

Russia-Ukraine War:रशिया-युक्रेन (Russia) युध्दामध्ये भारतीय विद्यार्थ्यांच मोठं नूकसान झालं आहे. अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. या विद्यार्थ्यांच शैक्षणिक नूकसानही झाले आहे. यावर आता नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) मोठा निर्णय घेतला आहे.

युक्रेनमधून (Ukraine) बाहेर काढण्यात आलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) दिलासा दिला आहे. 'युक्रेनमधून परत येणारे विद्यार्थी आता भारतातच त्यांची एक वर्षाची इंटर्नशिप पूर्ण करू शकतात.' अस एनएमसीने जाहीर केलं आहे. नॅशनल मेडिकल कमिशनने (NMC) एक पत्रक जाहीर करुन ही माहिती दिली आहे. अधिक माहितीसाठी, विद्यार्थी nmc.org.in वर भेट देऊन माहिती घेऊ शकतात.

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अपूर्ण इंटर्नशिप असलेल्या अनेक भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना भारतात परत यावे लागले आहे. या विद्यार्थ्यांना राज्य वैद्यकीय परिषदेत नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. 'कोविडच्या काळात भारतात परत आलेल्या विद्यार्थ्यांसाठीही ही सुविधा असेल' अस एनएमसीने म्हटले आहे.

युध्दामुळे विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांना इंटर्नशिप सोडून देशात परत यावे लागले आहे. या विद्यार्थ्यांना आता राहीलेली इंटर्नशिप देशात पूर्ण करता येईल असं एनएमसीने म्हटलं आहे.

एफएमजीई परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक

एनएमसीने (NMC) म्हटलं आहे की, युक्रेनमधून भारतात आलेल्या विद्यार्थ्यांनी एनबीईने घेतलेल्या एफएमजीई परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची काळजी राज्य परिषद घेईल. विद्यार्थ्यांनी सर्व पात्रता निकष पूर्ण केल्यास, त्यांना 12 महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी राज्य वैद्यकीय परिषदेकडून अंतरिम नोंदणी मंजूर केली जाईल. इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठी कॉलेज विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही याची काळजी राज्य परिषद घेतील. परदेशी वैद्यकीय पदवीधरांना दिले जाणारे स्टायपेंडही भारतातील सरकारी महाविद्यालयातील वैद्यकीय विद्यार्थ्यां इतकेच असेल, असे या परिपत्रकात सांगण्यात आले आहे.

Edited by- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

Narendra Modi News: पुण्यात PM नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान आरक्षणासाठी घोषणाबाजी; पोलिसांची अचानक धावाधाव

SCROLL FOR NEXT