Nigeria Man Crying Story Saam tv
देश विदेश

Guinness World Record Of Crying: ऐकावे ते नवलच! विश्व विक्रमासाठी पठ्ठ्या ७ दिवस रडला; काही वेळासाठी डोळ्यांची दृष्टीही गमावली

To Set a World Record, Man Cries Continuously For Seven Days: वर्ल्ड रेकॉर्डच्या नादात या नायजेरियन व्यक्तीने ७ दिवस रडून दृष्टी गमावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Vishal Gangurde

Crying World Record Goes Blind Temporarily: 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नावाची नोंद होणे खूप मोठी बाब आहे. यासाठी फार मेहनत घ्यावी लागते. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नावाची नोंद होण्यासाठी जगभरातील लोक कोणत्याही थराला जातात. अशाच प्रकारे वर्ल्ड रेकॉर्डसाठी अंगावर काटा आणणारा प्रकार नायजेरियन व्यक्तीने केला आहे. वर्ल्ड रेकॉर्डच्या नादात या नायजेरियन व्यक्तीने ७ दिवस सतत रडून दृष्टी गमावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, नायजेरियन व्यक्ती वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी सात दिवस रडला. सर्वात अवघड टास्क या पठ्ठ्याने केला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' नोंद होईल, या दृष्टीकोनातून नायजेरियन व्यक्ती खूप रडला.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, टेम्बू एबेरे हा व्यक्ती सात दिवस रडला. इतका रडला की, त्याने काही वेळासाठी डोळ्यांची दृष्टीच गमावली.

वर्ल्ड रेकॉर्ड करण्याच्या प्रयत्नात नायजेरियन व्यक्ती ७ दिवस सातत्याने रडत होता. सतत रडल्याने त्याची ४५ मिनिटांसाठी डोळ्यांची दृष्टीही गेली होती. रडून रडून या व्यक्तीचा चेहरा सुजला.

तसेच काही काळ त्याला डोकेदुखी जाणवत होती. तसेच डोळ्याच्या दृष्टीचाही त्याला त्रास झाला. मात्र, इतकं करूनही त्याचं नाव वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाले नाही. दरम्यान, या नायजेरिन व्यक्तीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी अर्ज केलेला नव्हता. त्यामुळे त्याची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद होणार नाही.

दरम्यान, नायजेरिन एबेरे म्हणाला की, मला दुसऱ्यांदा रणनीती बनवावी लागली. सात दिवस रडण्यासाठी खूप मेहनत केली. मात्र, काही दिवसांनी माघार घ्यावी लागली.

'मी 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'साठी अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे त्याची नोंद होणार नाही. अनेक नायजेरिन व्यक्तींनी या आधी अधिक काळ रडून रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला आहे,असाही तो म्हणाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT