देशाच्या विकासात रस्ते, महामार्ग महत्त्वाचे घटक असून महामार्ग मोठ्या प्रमाणात निर्माण केली जात आहेत. परंतु चांगले महामार्ग बनवूनही रस्ते अपघातांचे प्रमाणही जास्त आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांवर राष्ट्रीय महामार्ग अथॉरिटी ऑफ इंडियाने चिंता व्यक्त केलीय. अपघाताची समस्या सोडवण्यासाठी एनएचएआयकडून द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वामुळे रस्ते अपघातांना आळा बसणार आहे. मोठे अपघातही टाळता येतील. या नव्या नियमानुसार दर १० किलोमीटरवर मोठे फलक लावण्यात येणार आहेत.
फेब्रुवारी २०२५ पासून हे नवीन नियम लागू केले जाणार आहेत. नॅशनल हायवेवर १० किलोमीटरच्या अंतरावर साइन बोर्ड लावण्यात येईल. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने याबाबत सांगितलं की, सुरक्षित ड्राइव्हिंगसाठी रस्तांची चिन्हं आणि सांकेतिक चिन्ह खूप महत्त्वाची असतात. रस्त्यांची भाषा माहिती प्रत्येक चालकाला माहिती असणं आवश्यक आहे. यामुळे परिवहन मंत्रालयाने रस्त्यांच्या मालकीच्या कंपन्यांसाठी नियम जारी केले आहेत. यात प्रत्येक १० किमी अंतरावर फूटपाथवर वाहनांच्या वेगाची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
NHAIने यासंदर्भात म्हटलं की, वाहनांची वेगमर्यादा प्रत्येक ५ किमीवर लिहावी लागेल. तसेच महामार्ग आणि एक्स्प्रेस वेच्या मालकीच्या कंपन्यांना वाहनचालकांना माहिती देण्यासाठी दर ५ किमीवर नो पार्किंगचे संकेत बसवावे लागतील. प्रत्येक ५ किमी अंतरावर आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक लिहावा लागेल, असेही या मार्गदर्शक तत्त्वात म्हटलंय. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत कोणालाही त्रास होणार नाही.
राष्ट्रीय महामार्गांवर गुरांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी आणि प्रवास सुरक्षित करण्यासाठी NHAI नेही निर्णय घेतलाय. त्यासाठी पथदर्शी प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या प्रकल्पांतर्गत महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर प्राण्यांसाठी निवारे बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे रस्ते अपघात तर कमी होतील तसेच प्राण्यांच्या सुरक्षा होईल. या प्रकल्पांतर्गत जनावरांसाठी चारा आणि पाण्याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
यासोबतच जखमी जनावरांवरही उपचार केले जाणार आहेत. दरम्यान जगभरात रस्ते अपघात होण्याचे सर्वाधिक प्रमाण भारतात आहे. वर्ष २०२१ मध्ये देशात रस्ते अपघातात एकूण १,५३,९७२ लोकांचा मृत्यू झाला. तर २०२२ मध्ये ही संख्या वाढली असून १,६८,४९१ इतकी झाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.