Wreckage of the overturned truck and crushed rickshaw after the fatal accident that killed four members of a family just a day after a wedding. Saam tv
देश विदेश

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-बायको आणि आईसह वहिनीचाही मृत्यू, नेमके काय घडले?

Newly Married Couple Dies In Road Accident India: मध्यप्रदेशमध्ये लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-नवरीसह चार जणांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. ट्रक रिक्षावर उलटल्याने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

Omkar Sonawane

मध्यप्रदेश राज्यातून एक अत्यंत वेदनादायक घटना समोर आली आहे. एका भीषण अपघातात लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरदेव आणि नवरीचा मृत्यू झाला. या अपघातात नवरदेवाच्या आईसह वाहिणीचाही मृत्यू झाला असून एका हसत्याखेळत्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार. विरेन्द्र शाक्य यांचा विवाह शुक्रवारी राजेश्वरीसोबत पार पडला. लग्नानंतर शनिवारी विरेन्द्र त्याच्या बायकोला, ईला आणि वाहिनीला रिक्षाने आपल्या गावी घेऊन जात होता. त्यानंतर रस्त्यात एका दुकानाजवळ विरेन्द्रच्या बहिणीने काही समान घेण्यासाठी रिक्षा थांबवली आणि ती दुकानात गेली. रिक्षात हे तिघे बसलेले असताना त्याच वेळी एक ट्रक तेथे आला आणि त्या ड्रायव्हरचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि तो थेट उभ्या असलेल्या रिक्षावर उलटला.

ट्रक रिक्षावर उलटताच मोठा आवाज झाला आणि परिसरात एकच खळबळ माजली. स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जेसीबीच्या साहाय्याने ट्रकखाली दबलेली पोती हटवली. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर रिक्षातील लोकांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी चारही जणांना मृत घोषित केले.

या अपघातात सुदैवाने रिक्षा चालक आणि विरेन्द्रची बहीण भुरीया बचावले. विशेष म्हणजे, आजच भूरिया शाक्य यांचा लग्नाचा पूर्व विधी सोहळा पार पडणार होता. घरात आनंदाचे वातावरण होते, पाहुणे येणार होते, मात्र त्याआधीच एका क्षणात होत्याचे नव्हते झाले.

रिक्षावर ट्रक उलटल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. आरोपी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma: रोहित शर्मा कधी खेळणार? मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातून आली नवी अपडेट

Diljit Dosanjh: कॉन्सर्टमध्ये आंदोलन करणाऱ्यांवर दिलजीत दोसांझ संतापला, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra News Live Update: बीडच्या माजलगांव तालुक्यात “टाळा ठोको” मोर्चा

Mungya Yene: मुंग्या नेहमी एका रांगेत का चालतात? काय आहे मागचं कारण?

महाराष्ट्र हादरला! साडेतीन वर्षांच्या मुलीच्या हत्येनंतर मुख्यमंत्री आक्रमक; पोलीस अधिक्षकांना दिले कडक आदेश

SCROLL FOR NEXT