Accident  Accident
देश विदेश

हृदयद्रावक! थाटामाटात लग्न लागलं, वरात निघाली; भीषण अपघातात नवरा-नवरीसह ७ जणांचा मृत्यू

Uttar Pradesh Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये सात जणांचा मृत्यू झालाय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:शोकव्यक्त केलाय.

Namdeo Kumbhar

Uttar Pradesh Accident : उत्तर प्रदेशसाठी शनिवारचा दिवस घातवार ठरला आहे. मध्यरात्री झाशीमध्ये रुग्णालयात होरपळून दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. तर सकाळी बिझनौरमध्ये अपघातामध्ये एकचा कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झालाय. दुर्देवी म्हणजे, या अपघातामध्ये नवविवाहित दाम्पत्याचा समावेश आहे. लग्न करुन निघालेल्या नवरा-नवरीला मृत्यूने गाठले.

उत्तर प्रदेशमधील बिझनौरमध्ये हरिद्वार-काशीपूर राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. हुंडई क्रेटा कारने एका ऑटोला जोरदार धडक दिली. पहाटेच्या धुक्यामुळे कार चालकाला अंदाज आला नाही, त्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. ऑटो चालकाचे उपचारावेळी निधन झाले. मृतामध्ये नवविवाहित पती-पत्नींचा समावेश आहे.

पोलिसांनी काय माहिती दिली ?

शनिवारी सकाळी अपघाताची माहिती मिळाली. क्रेटा कार दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत असताना अचानक लेन बदलली गेली आणि भरधाव वेगात असलेल्या ऑटोला धडकली. त्यात धुके असल्यामुळे कार चालकाला अंदाज आला नाही.ऑटोमध्ये 7 लोक होते, त्यापैकी 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. सध्या सर्वांचे पोस्टमॉर्टम करण्यात येत आहे, अशी माहिती बिजनौरच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

मृतकांमध्ये 4 पुरुष, 2 महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. मृतामध्ये 65 वर्षीय खुर्शीद, त्यांचा मुलगा विशाल (25 वर्ष), पुत्रवधू खुशी (22 वर्ष), पत्नी मुमताज (45 वर्ष), मुलगी रूबी (32 वर्ष) आणि 10 वर्षीय बुशरा यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिजनौर जिल्ह्यातील रस्ते अपघाताची दखल घेतली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT