New Parliament Inauguration saam tv
देश विदेश

New Parliament Inauguration: राष्ट्रपती मागासवर्गीय असल्याने त्यांच्या हस्ते संसदेचं उद्घाटन केले नाही, काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

Vijay Wadettiwar serious allegations on modi government: विरोधकांनी नवीन संसदभवनाच्या उद्घाटन समारंभावरून केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Chandrakant Jagtap, साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Vijay Wadettiwar Criticize Modi Government : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचं (New Parliament) लोकार्पण नुकतंच पार पडलं. पूर्वीपेक्षा मोठे आणि आकर्षक संसद भवन भारताला मिळाले आहे. नवीन संसदेच्या उद्घाटनानंतर (New Parliament Building Inauguration) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांसमोर उभे राहून देशाला संबोधित केले.

यावेळी पंतप्रधान मोदींनी (PM Modi) वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रखडपणे भाष्य केले. परंतु विरोधकांनी या उद्घाटन समारंभावरून केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.

वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नवीन संसदभवनाच्या उद्घाटनावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. नवीन संसद भवनाचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम होत असताना देशात एक दलित राष्ट्रपती आहे. कदाचित त्यांच्या पंडितांनी त्यांना सांगितले असेल की त्यांच्या हस्ते उद्घाटन करू नका, मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी या सरकारचे कान भरले आहेत की काय? असा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.

'राष्ट्रपती आदिवाशी असल्याने...'

वडेट्टीवार म्हणाले, या कार्यक्रमाला महिलांना बोलावू नका विशेषतः त्या आदिवासी आहेत त्यांना बोलावू नका आणि त्यांच्या हस्ते करू नका, त्यांच्या पंडितांनी त्यांना सांगितले असेल. त्यामुळे आदिवासी महिलेच्या हस्ते लोकार्पण सोहळा केला नसावा.

हे मनुवादी विचारसरणीचे लोक ओबीसी आणि आदिवासी विरोधी आहेत, हे स्पष्ट झाले आहे अशा शब्दात त्यांनी केंद्रावर हल्लाबोल केला. ही संसद इमारत नसून मनुवादी विचारसरणीला उजाळा देणारी वास्तू झाली आहे की काय अशा प्रकारची परिस्थिती आता उद्भवली आहे असेही ते म्हणाले. (New Parliament Inauguration)

राहुल गांधी काय म्हणाले?

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी ट्वीट करत फक्त दोन ओळींमध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. 'संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत.', अशा शब्दात ट्वीट करत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. (Latest Political News)

काँग्रेसने या कार्यक्रमला आधीच विरोध करत बहिष्कार टाकला होता. या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले नसल्याचा दावा करत अनेक विरोध पक्षांनी कार्यक्रमाला हजेरी न लावण्याचा निर्णय घेतला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT