new corona virus  Google
देश विदेश

New Bat Coronavirus in China : जगावर पुन्हा कोरोनासारखं संकट? चीनच्या व्हायरसमुळे जग चिंतेत, वाचा सविस्तर

New Bat Coronavirus in China Update : आता बातमी आहे तुमची धडकी भरवणारी....कारण चीनमध्ये कोरोनासारखाच नवा विषाणू आढळलाय...याचा सर्वाधिक धोका आहे तो लहान मुलांना, या विषाणूचं नाव काय आहे? आणि लहान मुलांना कसा धोका आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये....

Bharat Mohalkar

कोरोनामुळे जगभर मृत्यूचं तांडव घडवणाऱ्या चीनच्या वूहान लॅबमध्ये आता कोरोनासारखाच घातक नवा विषाणू आढळलायं...हा विषाणू चीन बाहेर पसरल्यास संपूर्ण जग पुन्हा एकदा थांबण्याची शक्यता वर्तवली जातेय..विशेषतः लहान मुलांना या व्हायरसचा धोका जास्त आहे. 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने या नव्या विषाणूचा मुलांना सर्वाधिक धोका आहे...त्यामुळे सर्व देशांचं टेंशन वाढलंय. चीनच्या वुहान लॅबमध्ये आढळलेला आणि जगाचं टेन्शन वाढवणाऱ्या विषाणूची वैशिष्ट्ये काय आहेत? पाहूयात....

चीनच्या नव्या व्हायरसने जगाला धडकी

'HKU5' हा नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस

हाँगकाँगमधल्या जपानी वटवाघळांमध्ये हा विषाणू प्रथम आढळला

कोव्हिड-19 ला कारणीभूत ठरणारा HKU5 हा विषाणू

जनावरांमधून माणसामध्ये होतो HKU5 विषाणूचा संसर्ग

ACE2 रिसेप्टरशी संबंधित हा विषाणू माणसांमध्ये पसरण्याचा धोका

नव्या विषाणूचा लहान मुलांना सर्वाधिक धोका

महाभयंकर विषाणू आढळल्याचं साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट आणि शी झेंगली या अभ्यास संस्थेने दुजोरा दिलाय. 5 वर्षांपेक्षा लहान मुलं, 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे अशांना या संसर्गाचा धोका अधिक असतो त्यामुळे या नव्या विषाणूपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी? पाहूयात..

नव्या विषाणूपासून काय काळजी घ्याल?

मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा

शिंकताना, खोकताना नाकासमोर रुमाल ठेवा

आजारी असताना लोकांशी हस्तांदोलन किंवा गळाभेट टाळा

चीनमध्ये निर्माण झालेला हा नवा विषाणू आपल्या दारावर टकटक करण्याआधी आपण स्वतःची आणि मुलांचीही काळजी घ्यायला हवी... एवढंच नाही तर प्रशासनानेही आंतरराष्ट्रीय प्रवाशांची चाचणी करायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: भरधाव कंटेनर गणरायाच्या आगमन मिरवणुकीत घुसला, १४ जणांना चिरडलं; २ शेतकऱ्यांनी जागीच सोडले प्राण

Maharashtra News Live Update: पुण्यात ३५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT