Earthquake Saam Digital
देश विदेश

Nepal Earthquake : नेपाळमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के; 4.5 तीव्रतेच्या धक्क्यांनी हादरला परिसर

प्रविण वाकचौरे

Nepal Earthquake :

नेपाळमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मकवानपूर जिल्ह्यातील चितलांग येथे 4.5 तीव्रतेचा भूकंप जाणवला. गुरुवारी म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी पहाटे हे हादरे बसले.

भूकंपात अद्याप कुठेही मोठी हानी झाली नसल्याचे समोर आले आहे. या महिन्याच्या सुरुवातीला 3 नोव्हेंबर रोजी नेपाळमध्ये 6.4 तीव्रतेच्या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. ज्यामध्ये मोठी जीवितहानी आणि वित्तहानी देखील झाली होती. शेकडो लोकांचा त्यात मृत्यू देखील झाला होता.

नेपाळ अजूनही 3 नोव्हेंबर रोजी आलेल्या 6.4 तीव्रतेच्या भूकंपातून सावरत आहे. या भूकंपात जीवित आणि मालमत्तेच्या हानीतून नेपाळचं मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर आज बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे समस्या आणखी वाढली आहे.

भारताकडून मदत

भारताने 6.4 तीव्रतेच्या भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांना आपत्कालीन मदत पॅकेज पाठवले होते. ज्यात वैद्यकीय उपकरणे, मदत सामग्री आणि बरेच काही समाविष्ट होते. भारताने भूकंपग्रस्त समुदायांना मदत करण्यासाठी आवश्यक औषधे आणि मदत साहित्य पाठवले. तीव्र भूकंपानंतर नवी दिल्ली आणि उत्तर भारताचा काही भागही हादरला होता. या भूकंपात नेपाळमधील 157 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: अहेरी विधानसभेत दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

Western Railway Jobs : पश्चिम रेल्वेत सर्वात मोठी भरती, तब्बल ५०६६ जागा भरणार, पगार किती ? तुम्ही पात्र आहात का? जाणून घ्या

Sara Ali Khan Networth: 'पतौडी' घराण्यात जन्मली सारा; संपत्तीचा आकडा वाचून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT