Delhi Doctor  Saam Tv
देश विदेश

Crime News: भयंकर! मद्यधुंद तरुणांनी मित्राच्या पोटात घातली व्होडकाची बॉटल; डॉक्टरही चक्रावले

या धक्कादायक प्रकरणात एका मित्राला अटक केली असून काही मित्र फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Gangappa Pujari

Nepal: नेपाळमधून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे, जो ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. नेपाळमधील डॉक्टरांनी एका तरुणाच्या पोटातून चक्क दारुची बाटली शस्त्रक्रिया करुन बाहेर काढली आहे. नूरसाद मंसूरी असे या ३५ वर्षीय युवकाचे नाव असून या धक्कादायक प्रकारानंतर भयंकर माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एकाला अटक देखील करण्यात आली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू. (Latest Marathi News)

नेपाळच्या (Nepal) रौतहाट जिल्ह्यात राहणाऱ्या नूरसाद मन्सुरी यांने पोटात दुखत असल्याचे सांगत डॉक्टरांकडे गेला होता. तपासण्या केल्यानंतर त्याच्या पोटात व्होडकाची बाटली असल्याचे समोर आले. त्यानंतर नूरसादवर शस्त्रक्रिया (operation) करुन ती बाटली बाहेर काढण्यात आली. या तरुणाला पाच दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

अडीच तासांच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्याच्या पोटातून बाटली बाहेर काढण्यात आली. बाटलीमुळे त्याचे आतडे फाटले होते. मात्र आता त्याच्या जीवाला कोणताही धोका नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी महत्वाचा खुलासा केला आहे, ज्यामध्ये त्यांनी नुरसदच्या मित्रांनी त्याला दारू पाजली आणि त्याच्या गुदाशयातून जबरदस्तीने बाटली पोटात टाकली असावी, असे नमूद केले आहे. तसेच नूरसादच्या पोटात गुदामार्गातून बाटली घातल्याचा संशय आहे, असे अहवालातही म्हटले आहे. या घटनेप्रकरणी रौतहाट पोलिसांनी शेख समीम याला अटक केली असून नुरसदच्या काही मित्रांचीही चौकशी केली आहे. या भयंकर घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे.

दरम्यान, याआधी गुजरातमध्येही अशाच प्रकारची घटना समोर आली होती. या घटनेत एका मुलाच्या पोटात स्टिलचा ग्लास घातल्याचा आरोप करण्यात आला होता...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silver Anklet Designs : लाडक्या नातीसाठी चांदीचे खास पैंजण, ८ नवीन डिझाईन्स पाहाच, लहान मुलींवर दिसतील खूपच सुंदर

Imarti Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि रसाळ इमरती,वाचा रेसिपी

Rain Update : महाराष्ट्रात परतीच्या पावसाने जोर धरला, कोकणासह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामानाचा अंदाज काय?

Maharashtra News Live Update:वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी लोणारमध्ये ग्रामस्थ आक्रमक; नागपूर करार १९५३ ची प्रतिकात्मक होळी

Thane News: ठाणे हादरले! शिवसेना नेत्याचा गोळीबारात मृत्यू, १ मिनिटं २ सेकंदाचा थरारक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT