Nepal Tiktok Ban Saam Tv
देश विदेश

Tiktok Ban: चीनी नेटवर्किंग प्लॅटफॉर्मला मोठा धक्का, नेपाळनेही टिकटॉकवर घातली बंदी; अॅपवर केले गंभीर आरोप

Nepal Tiktok Ban: चीनी नेटवर्किंग प्लॅटफॉर्मला मोठा धक्का, नेपाळनेही टिकटॉकवर घातली बंदी; अॅपवर केले गंभीर आरोप

Satish Kengar

Nepal Tiktok Ban:

भारतानंतर नेपाळनेही चीनच्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म टिकटॉकवर बंदी घातली आहे. नेपाळ सरकारने सोमवारी टिकटॉकवर बंदी घातली. कारण त्याचा सामाजिक सौहार्दावर नकारात्मक परिणाम होत आहे, असं नेपाळमधील सरकारचं म्हणणं आहे.

सरकारच्या प्रवक्त्या रेखा शर्मा यांनी सांगितले की, या संदर्भात आज मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये चिनी अॅप TikTok वर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या म्हणाल्या की, टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय संचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून लागू केला जाईल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काठमांडू पोस्ट वृत्तपत्राच्या बातमीनुसार, ही बंदी नेपाळ सरकारने TikTok मूळे समजावर होत असलेल्या नकारात्मक परिणाम लक्षात घेऊन टाकली आहे. याबाबत नेपाळ सरकारच्या मंत्रिमंडळाचीही गुरुवारी बैठक झाली. यामध्ये, Facebook, X (पूर्वीचे Twitter), TikTok आणि YouTube यासह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देशातील संपर्क कार्यालये उघडणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Latest Marathi News)

सरकारने म्हटले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे. परंतु समाजातील मोठ्या घटकांनी टिकटॉकवर प्रश्न उपस्थित केले आहेत. हे द्वेषयुक्त भाषणाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप लोकांनी केला. गेल्या वर्षी या व्हिडीओ शेअरिंग अॅपचा वापर करून सायबर गुन्ह्यांची १,६४७ प्रकरणे नोंदवण्यात आली होती.

चीनी नेटवर्किंग प्लॅटफॉर्मसाठी मोठा धक्का

मंत्री रेखा शर्मा यांनी स्पष्ट केले की, टिकटॉक बंद करण्याचा निर्णय मुदत निश्चित केल्यानंतर लागू केला जाईल. मात्र, नेपाळी काँग्रेसचे सरचिटणीस गगन थापा यांनी या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट केले की, 'टिकटॉकवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा आहे. सरकारने सोशल मीडिया साइट्सचे नियमन करावे. हा निर्णय चिनी नेटवर्किंग प्लॅटफॉर्मसाठी धक्कादायक आहे. दरम्यान, भारत, अमेरिका , ईयू आणि यूकेसह विविध देशांच्या सरकारांनी सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी घातली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT