नीट परीक्षा २०२६ रद्द
नीट २०२६ ची पुन्हा परीक्षा होणार का?
नीट परीक्षेबाबतची सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी नीट २०२६ परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने काल ही परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली.पेपर फुटल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामळे २२ लाख विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
नीट परीक्षा पुन्हा कधी होणार, परीक्षेची तारीख काय, परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन कसं आणि कुठे करायचं, फी भरावी लागणार का असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना पडले आहे. दरम्यान, याबाबत एनटीएने माहिती दिली आहे.
NEET UG 2026 Re Exam Date: नीट २०२६ ची पुन्हा परीक्षा कधी होणार?
नीट परीक्षा कधी होणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, एनटीए लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करणार आहे. त्यानुसार परीक्षा होईल. NTA Official Website वर तुम्हाला परीक्षेबाबत सर्व माहिती मिळणार आहे.
NEET UG Registration: नीट परीक्षेसाठी पुन्हा अर्ज करावा लागणार का?
नीट यूजी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. एनटीएकडे आधीपासूनच विद्यार्थ्यांची माहिती आहे. ही माहिती पुढील प्रक्रियेसाठी वापरली जाणार आहे.
NEET UG Exam Fee : नीट परीक्षेसाठी फी किती भरावी लागणार?
नीट परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतीही फी भरावी लागणार नाही. आधी भरलेली परीक्षा फी वैध मानली जाणार आहे.
NEET New Admit Card : नीट परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड मिळणार का?
नवीन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर एनटीए अॅडमिट कार्ड जारी करेल. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवरुन हे वेळापत्रक डाउनलोड करता येणार आहे.
NEET UG Exam Cancel Reason: नीट यूजी परीक्षा रद्द का करण्यात आली?
नीट यूजी २०२६ परीक्षा ३ मे २०२६ रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आले. टेलिग्राम ग्रुपवर हा पेपर परीक्षेआधीच देण्यात आला होता. त्यामुळेच परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.