Subodh Kumar Singh  sandesh
देश विदेश

NEET Paper Leak Case: सरकारची मोठी कारवाई, NTA महासंचालक सुबोध कुमार सिंह यांना पदावरुन हटवलं

Bharat Jadhav

NEET-UG आणि UGC-NET परीक्षेतील घोळ प्रकरणी सरकारने अॅक्शन मोडवर आले असून केंद्र सरकारने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) प्रमुख सुबोध कुमार सिंह यांना पदावरुन हटवंल आहे. त्यांना कार्मिक आणि प्रशिक्षण विभागात सक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आलंय. नियमित प्रमुखाची नियुक्ती होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत, १९८५ च्या बॅचचे सेवानिवृत्त अधिकारी प्रदीप सिंग करोला यांना महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आलीय.

गेल्या दोन महिन्यांपासून NTA देशातील दोन सर्वात मोठ्या स्पर्धात्मक परीक्षा - राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा-ग्रॅज्युएट (NEET-UG) आणि विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा यांमधील कथित अनियमितता आणि पेपर लीकची चौकशी करत आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) चे सर्वोच्च नेतृत्व स्पर्धा परीक्षांमध्ये कथित अनियमिततेची चौकशी केली जात असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दिली.

कोण आहे सुबोध सिंह?

मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले सुबोध कुमार यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुरकी येथून अभियांत्रिकीमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी घेतलीय. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) नवी दिल्ली येथून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. गेल्या जूनमध्ये त्यांची सध्याची भूमिका स्वीकारण्यापूर्वी IAS अधिकारी सुबोध सिंह केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागात अतिरिक्त सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांनी २००९ ते २०१८ पर्यंत नऊ वर्षे छत्तीसगड सचिवालयात भारतीय जनता पक्षाचे (भाजप) मुख्यमंत्री रमण सिंह यांच्या नेतृत्वाखाली काम केलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

SCROLL FOR NEXT