NEET Paper Leak Saam Tv
देश विदेश

NEET Paper Leak: विद्यार्थी आंदोलनादरम्यान मोठी घडामोड, नीट पेपर फुटीप्रकरणातील मुख्य आरोपीला क्लिनचीट

CBI On NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटी प्रकरणात आज मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य आरोपी संजीव मुखियाला क्लिनचीट देण्यात आली.

Priya More
  • नीट यूजी २०२४ पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट

  • सीबीआयने संजीव मुखियाला क्लिनचीट दिली

  • प्रश्नपत्रिका फोडणे किंवा वाटप केल्याचा पुरावा न मिळाल्याचे सीबीआयने सांगितले

  • संजीव मुखियाविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही

नीट पेपर फुटीप्रकरणावरून विद्यार्थी आक्रमक झाले असून दिल्लीत आंदोलन सुरू आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेंनी हे आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थी आणि विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. हे आंदोलन सुरू असतानाच नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

सीबीआयने या प्रकरणातील मुख्य आरोपी संजीव कुमार उर्फ संजीव मुखियाला क्लिनचीट दिली आहे. नीट यूजी २०२४ ची प्रश्नपत्रिका फोडण्यात किंवा या प्रश्नपत्रिका वितरित करण्यात संजीव मुखियाचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा आढळून आला नाही त्यामुळे सीबीआयने त्याला क्लिनचीट दिली आहे. त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सीबीआयने सांगितले की, २०२४ मध्ये बिहार पोलिसांनी नीट-यूजी २०२४ परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची चोरी उघडकीस आणली आणि गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासात संजीव मुखियावर संशय व्यक्त करण्यात आला होता. कारण तो यापूर्वीही अनेक प्रश्नपत्रिका चोरी आणि पेपर फुटीच्या प्रकरणांमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले होते. या आधारावर बिहार पोलिसांनी एफआयआरमध्ये त्याचे नाव आरोपी म्हणून नमूद केले होते.

त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आला होता. तपासादरम्यान प्रश्नपत्रिका चोरणे, प्रसारित करणे आणि त्यातून नफा कमावणे यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवल्याचे सीबीआयने सांगितले. त्यानंतर सीबीआयने पाटणा येथील सक्षम न्यायालयात एकूण ४५ आरोपींविरुद्ध अनेक आरोपपत्रे दाखल केली. नीट-यूजी २०२४ ची प्रश्नपत्रिका चोरण्याच्या किंवा वितरित करण्याच्या कटामध्ये संजीव मुखिया यांचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही, असे सीबीआयने सांगितले.

सीबीआयने सांगितले की, त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला असून संपूर्ण कट आणि त्यात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना संजीव मुखिया फरार होता. नंतर बिहार पोलिसांनी त्याला अटक केली. नीट पेपरफुटी प्रकरणात त्याचे नाव होते त्यामुळे सीबीआयने त्याला या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिस कोठडीत घेतले. पण चौकशी आणि तपासादरम्यान त्याच्याविरोधात एकही पुरावा आढळून आला नाही त्यामुळे या प्रकरणात त्याच्याविरोधात कोणतेही आरोपपत्र दाखल केले नाही आणि त्याला जामीन मंजूर करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खलील शेख आत्महत्या प्रकरण; शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Jana Nayagan: 'जन नायकन'साठी थलापती विजय यांनी घेतलं तगडं मानधन, 'या' अभिनेत्रीला मिळाली सर्वात कमी फी

मोड आलेली मटकी खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात?

सरकारकडून २४ तासात ४ वेळा प्रस्ताव; नड्डांच्या निवासस्थानी किंवा कार्यालयात होणार चर्चा, CJPकडून मात्र नकार

'हे' 7 उपाय केल्यास तुमच्याकडे पैसाच पैसा येईल

SCROLL FOR NEXT