NDA candidate Jyoti Manjhi injured after stone-pelting attack during election campaign in Gaya. saam tv
देश विदेश

मोठी बातमी! निवडणूक प्रचारादरम्यान NDAच्या महिला उमेदवारावर हल्ला,दगडफेकीत आमदाराचं डोकं फुटलं

NDA Woman Candidate Attacked: ज्योती मांझी जनसंपर्क मोहिमेसाठी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. ज्योती मांझी या दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.

Bharat Jadhav

  • याआधीही 'हम पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार गाड्यांवर हल्ला झालाय.

  • संतप्त ग्रामस्थांनी आमदारांच्या ताफ्यावर विटा आणि दगडांनी हल्ला केला.

  • मतदारसंघात प्रचारासाठी जात असताना एनडीएच्या उमेदवारावर दगडफेक

गया जिल्ह्यातील बाराचट्टी विधानसभा मतदारसंघातील एनडीए उमेदवारवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. प्रचार करताना 'हम' HAM आमदार ज्योती मांझी यांच्यावर हल्ला झाला असून त्यात त्याचे डोकं फुटलं आहे. ज्योती मांझी या आज त्या त्यांच्या मतदारसंघात प्रचारासाठी जात होत्या. त्यादरम्यान त्यांच्यावर दगडफेकीची घटना घडलीय. त्या सुलेबट्टा वळणाजवळ आल्या असता दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्यावर दगडफेक केली. यात उमेदवार ज्योती मांझी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.

डोक्याला दुखापत झाल्यानंतर ज्योती मांझी या रडू लागल्या. त्या रडत गाडीत बसल्या आणि स्थानिक रुग्णालयात दाखल झाल्या. तिला बाराचट्टी येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार घेत आहेत. त्यानंतर त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले. ज्योती मांझी या केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी यांच्यात नातेवाईक असून त्या त्यांच्या विहीन बाई आहेत. दरम्यान त्या HAM पक्षाकडून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.

याआधीही दोनवेळा 'हम पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार गाड्यांवर हल्ला झालाय. बाराचट्टी विधानसभा मतदारसंघातील मगध विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खरांती गावात अज्ञात तरुणांनी प्रचार वाहनावरील पोस्टर फाडलं होतं. दुसरी घटना मोहनपूर पोलीस स्टेशन हद्दीतील देमा गावातील जनसंपर्क मोहिमेदरम्यान घडली होती. येथे दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तरुणांनी गर्दीत घुसून "ज्योती मांझी मुर्दावाद" आणि "राजद जिंदाबाद" अशा घोषणा दिल्या होत्या.

दरम्यान ज्योती मांझी याच्या व्यतिरिक्त गयाजीच्या टिकारी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि हिंदुस्थान अवाम मोर्चा (HAM) चे उमेदवार अनिल कुमार यांच्यावर प्रचार मोहिमेदरम्यान दगडफेक करण्यात आली होती. हा हल्ला दिघौरा गावात घडली होती. संतप्त ग्रामस्थांनी आमदारांच्या ताफ्यावर विटा आणि दगडांनी हल्ला केला होता. यात अनेक वाहनांच्या काचा फुटल्या होत्या. तर आमदार अनिल कुमार यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली होती. काही समर्थकांनाही दुखापत झाली होती. या घटनेसंदर्भात नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha Crime: एका हट्टापायी मैत्रीनं घेतला गळ्याचा घोट; खोलीत शिरला अन् तिला संपवून मोबाईल घेऊन पळाला

Voter Scam: हरियाणात 25 लाख व्होट चोरी; राहुल गांधींनी फोडला हायड्रोजन बॉम्ब

High Speed Internet: गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोहोचणार; इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी सराकारचा करार

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

SCROLL FOR NEXT