NDA Gets Stronger Saam Tv
देश विदेश

Politics: मोठी बातमी! NDA ची ताकद वाढली, ४ मोठे पक्ष सहभागी; संख्याबळ ४२ खासदारांनी वाढले

NDA Gets Stronger: एनडीएची ताकद वाढत चालली आहे. ४ मोठे पक्ष एनडीएत आल्यामुळे लोकसभेत खासदारांचे संख्याबळ वाढले आहे.

Priya More

लोकसभेमध्ये एनडीएची ताकद वाढली. नुकताच शिरोमणि अकाली दल एनडीएमध्ये आला. लोकसभा निवडणुकीला ३ वर्षे बाकी आहेत. त्यापूर्वीच एनडीएने लोकसभेत आपली ताकद वाढवली आहे. एनडीएला मित्र पक्षाच्या पुनरागमनामुळे मोठा फायदा झाला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर शिरोमणी अकाली दलाव्यतिरिक्त शिवसेना, जनता दल युनायटेड आणि तेलगू देसम पार्टी एनडीएमध्ये आले. त्यामुळे एनडीएचे संख्याबळ ४२ खासदारांनी वाढले आहे.

२०१८ मध्ये टीडीपी, २०१९ मध्ये शिवसेना, २०२० मध्ये शिरोमणी अकाली दलाने एनडीएची साथ सोडली होती. तर नितीश कुमार यांच्या जदयूचे एनडीएमध्ये येण्याचे प्रयत्न सुरू होते. २०२४ मध्ये जदयू एनडीएत आला. २०२४ च्या निवडणुकीत शिरोमणी अकाली दलाला सोडून हे सर्व पक्ष एनडीएत आले. या व्यतिरिक्त असाम गण परिषद, एआयएडीएमकेसारखे पक्ष देखील वेगळं झाल्यानंतर एनडीएत आले.

मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २४० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले होते २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत भाजपला बहुमत मिळवता आले नाही. तेलगू देसम पक्षाचे १६ खासदार, जनता दलाचे १२ सदस्य आणि शिंदेंच्या शिवसेनेसह अनेक पक्षांच्या पाठिंब्याने भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला.

२०२४ च्या निवडणुकीत शिवसेनेने एकूण ७ जागा जिंकल्या. त्यानंतर जून २०२६ मध्ये पक्षाला आणखी सहा खासदारांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांची संख्या १३ झाली होती. यामध्ये संजय दीना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचूरे, नागेश पाटील आणि ओमप्रकाश राजे निंबाळकर यांचा समावेश आहे. या खासदारांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेसेनेत प्रवेश केला होता.

सध्या संसदेत जेडीयूच्या खासदारांची संख्या १२ आहे. २०१३ मध्ये जेडीयूने पहिल्यांदा एनडीएतून बाहेर पडत राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला. त्यानंतर नितीश कुमार यांचा पक्ष २०१७ मध्ये एनडीएत परत आला. २०२२ मध्ये जेडीयूने पुन्हा एनडीए सोडली पण जानेवारी २०२४ मध्ये हा पक्ष एनडीएत परत आला. महत्वाचे म्हणजे, भाजपने जेडीयूसाठी एनडीएचे दरवाजे बंद झाल्याचेही जाहीर केले होते. पण एनडीएमध्ये परत आल्यानंतर नितीश कुमार यांनी सांगितले की, 'आता परत जाण्याचा प्रश्नच येत नाही.'

तर दुसरीकडे नुकताच भाजपने पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाचा पाठिंबा पुन्हा मिळवला आणि केंद्रात फक्त एक खासदार असलेल्या या पक्षाने एनडीएची ताकद वाढवली. २०२० मध्ये तीन कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या तणावानंतर आपला सर्वात जुना मित्रपक्ष मानल्या जाणाऱ्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा केली. एप्रिलमध्ये त्यांनी घटनादुरुस्ती विधेयकालाही पाठिंबा दिला नव्हता. पण आता पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजप आणि अकाली शिरोमणी दल एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा अमित शाह यांनी जाहीर केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळे बैठक सोडून रुग्णालयाकडे रवाना

Sharad Pawar Hospitalised : शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; बैठक सोडून सुप्रिया सुळे तातडीने रुग्णालयाकडे रवाना

Gold Rate Today : सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीही ४००० रुपयांनी महागली; वाचा आजचे दर

Health Tips : पपई खाताय? मग सावधान! या ४ प्रकारच्या लोकांनी खाणं टाळावं, होऊ शकतो त्रास

High Cholesterol: कोलेस्ट्रॉल फक्त हृदयाच्या नसांमध्येच नाही, तर पायांच्या नसांमध्येही साचतं! दुर्लक्ष केल्यास पाय कापण्याची येऊ शकते वेळ

SCROLL FOR NEXT