Sharad Pawar NCP News Saam tv news
देश विदेश

NCP Political Crisis: मोठी बातमी! शरद पवार गट निवडणूक आयोगाला उत्तर देणार नाही; कारण आलं समोर

NCP Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट निवडणूक आयोगाला उत्तर सादर करणार नाही. शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे ४ आठवड्यांचा वेळ वाढवून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

Vishal Gangurde

प्रमोद जगताप

Sharad Pawar News: राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट निवडणूक आयोगाला उत्तर सादर करणार नाही. शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे ४ आठवड्यांचा वेळ वाढवून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Latest Marathi News)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट निवडणूक आयोगाला उत्तर सादर करणार नाही. शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला 4 आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला आहे.

अजित पवार यांच्या गटाने कोणती कागदपत्र दिली आहेत त्यांची यादी द्या म्हणजे त्यावर आम्हाला उत्तर देता येईल, असा मेल शरद पवार गटाने केला होता. पण त्याला निवडणूक आयोगाकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर देण्यात आलं नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

शरद पवार गटाने आता पुन्हा 4 आठवड्यांचा वेळ वाढवून मागितला आहे. पण त्यावरही निवडणूक आयोगाचं उत्तर मिळालं नाही. त्यात विशेष म्हणजे उद्यापर्यंत दोन्ही गटांना उत्तर सादर करायची निवडणूक आयोगाने मुदत दिली आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी ४० आमदारांच्या सही असलेलं पत्र निवडणूक दिलं होतं. अजित पवारांनी या पत्रात अजित पवार यांची राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे, यापत्राद्वारे अजित पवार यांनी पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केल्याचं पत्रात सांगण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! फक्त ₹5 लाख गुंतवा अन् कमवा ₹10 लाखांहून जास्त व्याज

Maharashtra News Live Update: पंढरपुरात पावसाची हजेरी

Fat Loss: सुटलेलं पोट होईल झटपट कमी; सकाळी कोमट पाण्यात टाकून प्या हा घरातला फायदेशीर पदार्थ

जिमला जाण्याची गरज नाही! खुर्चीवर बसून करा 'हे' 5 योगा, पोटावरची चरबी होईल कमी

Washim Flood : मुसळधार पावसाने कांचन नदीला पूर, रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद; शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान

SCROLL FOR NEXT