Viral News Saam Tv
देश विदेश

Viral News: अरे बापरे! गरबा खेळताना तरुणाच्या अंगात अचानक लागले लाईट्स? व्हायरल VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

Viral Video News: सध्या सर्वत्र नवरात्री उत्सवाचा उत्साह पाहण्यास मिळत आहे. त्या संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नक्की काय घडलं व्हिडिओ ते तुम्ही पाहा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर आपल्याला सुरु असलेल्या सणांचे अनेक व्हिडिओ पाहण्यास मिळतात. सध्या सर्वत्र नवरात्री उत्सवाची उत्सावाची उत्सुकता सर्वामध्ये पाहण्यास मिळत आहे. लहानापासून ते मोठ्या वयोगटातील व्यक्तीपर्यंत सर्वजण गरबा खेळण्यासाठी आतुरलेले आहे. नवरात्रीत गरबा खेळण्यासाठी अनेकजण या सणाची मोठ्या प्रमाणात वाट पाहत असतो. सध्या याच नवरात्री उत्सवासंबंधित एका तरुणाचा दांडिया खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय, मात्र यात तरुणाने जे काही केलं आहे ते पाहून नेटकऱ्यांनी व्हिडिओला मोठ्या संख्येने पसंती दिलेली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत अनेक तरुण तरुणी तुम्हाला दांडिया खेळताना दिसत आहेत. तरुणासह या व्हिडिओ काही लहान मुलं ही दिसून येत आहे. इतकेच नाही तर अनेकजण लांबून दांडिया खेळताना बाकीच्यांना पाहत आहे. व्हिडिओ पाहिले तर सर्वांनी साधारण कपडे परिधान केलेला आहे. मात्र व्हिडिओ (Video)एक तरुण असा आहे, ज्याने पिवळ्या रंगाचा शर्ट आणि सफेद रंगाची जीन्स घातलेली आहे. मात्र तुम्ही जर नीट पाहिले तर दिसेल की, त्याने संपूर्ण शरीराला लायटिंग केलेली आहे. लायटिंग केलेल्या कपड्यात तो तरुण दांडिया खेळताना दिसत आहे.

व्हायरल व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. शिवाय तो इन्स्टाग्रामवरील ''@ansh_bhalke_23'' पेजवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ साधारण कधीचा आहे हे समजू शकलेले नाही मात्र तो दोन दिवसापूर्वी इन्स्टाग्रामवर शेअकर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये,''बचपन का प्यार'' असे कॅप्शन लिहिण्यात आलेले आहे.

दोन दिवसापूर्वी व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याला तब्बल १२ हजार नेटकऱ्यांनी लाईक्स केलेले आहे तर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,''काय पोर ही कधी काय करतील सांगता येत नाही'' तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,'' देवा...'' तर अनेकांनी गमतीदार प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : मुंबईतील बैठक संपली; बेसिक सॅलरीमध्ये DA मर्ज होणार का? वाचा अपडेट्स

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची २७ तारखेला कर्जतमध्ये सभा

How to Peel Garlic: आता काही सेकंदात सोलून होईल लसूण; फक्त फॉलो करा या 3 टीप्स

Skin Cancer : नेलपेंट आणि मॅनिक्युरमुळे त्वचेचा कॅन्सर, तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा

Nanded : कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या; साम टीव्हीच्या बातमीनंतर फायनान्स कंपनीला टाळं

SCROLL FOR NEXT