Veteran BJP leader and four-time MLA Navnitlal Ninama passes away at the age of 88. saam tv
देश विदेश

४ टर्म आमदार राहिलेला भाजपच्या दिग्गज नेत्याचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Navnitlal Ninama Death News And Political Career: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार नवनीतलाल निनामा यांचे निधन झाले असून बांसवाडा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. जनसंघापासून भाजपपर्यंत त्यांनी संघटना मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले.

Omkar Sonawane

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार नवनीतलाल निनामा यांच्या निधनाने बांसवाडा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. जनसंघापासून भाजपपर्यंत संघटना मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. राजकारणातील एका युगाचा अंत झाला अशी भावना भाजप कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

Navnitlal Ninama death news and political career

बांसवाडा येथील जनसंघ आणि घाटोल मतदारसंघाचे चार वेळा आमदार राहिलेले नवनीतलाल निनामा यांचे गुरुवारी निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. मागच्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. भाजपसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. आणीबाणीच्या काळात जानेवारी 1976 ते जुलै 1977 पर्यंत ते कारागृहात होते. वागड प्रदेशाच्या उन्नतीसाठी आणि आदिवासींच्या हक्कांसाठी ते नेहमीच लढत असत.

Former BJP MLA Navnitlal Ninama biography and achievements

नवनीतलाल निनामा यांनी १९७२ मध्ये जनसंघाकडून पिपलखुंटा विधानसभा मतदारसंघातून प्रथम निवडणूक लढवली. निनामा यांनी १९८५ मध्ये भाजपकडून घाटोल विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विजय मिळवला आणि ते आमदार झाले. १९९० मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा निवडणूक जिंकली.

त्यानंतर त्यांनी २००३ आणि २०१३ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून आमदार म्हणून काम केले. मात्र त्यांना मंत्री होण्याची संधी कधीच मिळाली नाही. २०१८ मध्ये पुन्हा तिकीट नाकारल्यानंतर ते भारतीय आदिवासी पक्षात सामील झाले आणि त्यांनी निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते भाजपमध्ये सामील झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: इंधन बचतीसाठी अकोला पोलीस अधीक्षकांचा अभिनव उपक्रम

महागाईचा बॉम्ब फुटणार? कोणत्या जीवनावश्यक वस्तू महागणार?

Maharashtra Politics: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्याचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

भजन करताना चक्कर आली अन्..; थोर समाज प्रबोधनकार रामधन महाराज यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन| VIDEO व्हायरल

पुण्याला बॉम्बनं उडवण्याचा कट? हॉस्पिटलमध्ये कुणी ठेवला बॉम्ब?

SCROLL FOR NEXT