Punjab Election Result 2022 Saam Tv
देश विदेश

Punjab Election Result 2022: पंजाबमध्ये 'आप'च्या क्लीन स्वीपबद्दल काँग्रेसचे नेते सिद्धू यांनी केलं अभिनंदन म्हणाले.....

117 जागांमधील 91 जागांवरती आम आदमी पक्षाने आघाडी घेतली आहे. पंजाब मधील काँग्रेसने सत्ता गमावली आहे.

साम वृत्तसंथा

पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्ष (AAP) सर्वात मोठा पक्ष बनला आहे. 117 जागांमधील 91 जागांवरती आम आदमी पक्षाने आघाडी घेतली आहे. पंजाब मधील काँग्रेसने सत्ता गमावली आहे. आप ने एकहाती सत्ता मिळवली आहे. यावर पंजाब काँग्रेसचे प्रमुख नेते नवज्योतसिंग सिध्दु यांनी आम आदमी पक्षाला ट्विट (Tweet) करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

'लोकांचा आवाज हा देवाचा आवाज आहे. मी पंजाबच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारतो…. अभिनंदन!!!' अस ट्विट नवज्यातसिंग सिध्दु यांनी केलं आहे. त्यांनी आपला शुभेच्छा देवून अभिनंदन केलं आहे.

पंजाबमधील विजयानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या जनतेच आभार मानले आहेत. पंजाबमधील बहुमताला क्रांती असे वर्णन त्यांनी केलं आहे. या क्रांतीबद्दल राज्यातील जनतेचे अभिनंदन. असं ट्विट दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केले आहे. पंजाबमधील आपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्यासोबतचा एक फोटोही त्यांनी शेअर केला आहे.

पंजाबमध्ये (Punjab) काँग्रेस पक्षाला सगळ्यात मोठा धक्का बसला असून अंतर्गत गटबाजीचे राजकारण काँग्रेसच्या (Congress) पराभवास कारणीभूत ठरल्याचे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा पराभव होणे जवळपास निश्चितच झालं आहे. तर, काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग (Capt. Amarinder Singh) यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री केल्यानंतर पंजाबच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. मात्र, या दोन्हीही माजी मुख्यमंत्र्यांना पराभवास सामोरे जावे लागत आहे. पटियाला मधून कॅप्टन अमरिंदर सिंग पराभूत झाले आहेत. तर, चन्नी यांचा पराभव निश्चित झाला आहे. त्याचवेळी धुरी मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे नेते आणि पंजाबचे भावी मुख्यमंत्री भगवंत मान मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.

Edited by- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT