ONLINE FOOD ORDERS FLOOD JANTAR MANTAR saam tv
देश विदेश

आंदोलकांना देशभरातून मदतीचा हात, जंतर मंतरवर 'ऑनलाईन' लंगर

“Online Langar” at Jantar Mantar: दिल्लीत आंदोलकांसाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झालाय. देशातल्या सामान्य नागरिकांनी ऑनलाईन मदत या आंदोलनकांना सुरू केलीय. आता जंतरमंतरवर केवळ याच मदतीची चर्चा आहे? देशभरातून नेमकी काय मदत दिली जातेय? पाहूयात या रिपोर्टमधून...

Suprim Maskar

जंतरमंतरवरील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला... मात्र पोलिसांच्या लाठ्या खाऊनही आंदोलक मागे हटले नाहीत... मिळेल ते खाल्लं आणि जागा दिसेल तिथं आंदोलक झोपले.....पण केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हवाच, ही मागणी आंदोलकांनी सोडली नाही...तरुण आंदोलकांच्या याचं जिद्दीला आता संपूर्ण देशभरातून पाठिंबा मिळतोय...आंदोलकांसाठी जंतरमंतरवर 'फूड ऑर्डर्स'चा पाऊस पडलाय..गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन स्थळ हे फूड डिलिव्हरी करणाऱ्या मुलांचा मुख्य अड्डा बनले आहेत. स्विगी, झोमॅटो यांसारख्या विविध कंपन्यांचे डिलिव्हरी बॉईज आपल्या दुचाकींवरून जंतर मंतरवर येतात आणि फूड डिलिव्हरी करतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कोण करतंय या आंदोलकांना फूड फंडिंग? त्यासाठी हे ऐका.....

झारखंड, हैदराबाद, दिल्ली आणि पंजाबमधूनही अनेक नागरिक घरबसल्या जंतरमंतरचा पत्ता टाकून आंदोलकांसाठी हजारो रुपयांच्या फूड ऑर्डर करत आहेत. दिल्लीच्या कनॉट प्लेस परिसरातील रेस्टॉरंट्समधून एकाच दिवसात अंदाजे 500 हून अधिक ऑर्डर्स जंतरमंतरच्या पत्त्यावर आल्या. यामध्ये पिझ्झा, बर्गर, समोसे, जेवणाची थाळी, कढी-भात, बिर्याणी आणि फळांचा समावेश आहे.

फक्त ऑनलाईन ऑर्डर्सच नाही, तर दिल्लीतील स्थानिक नागरिकही स्वतःहून जंतरमंतरवर मदतीचे स्टॉल्स लावताना दिसले... अनेक ठिकाणी अन्नपदार्थांच्या राशीच्या राशी साठवून ठेवलेल्य़ा दिसल्या... मुंबईतील रहिवासी असलेल्या अनुज रावत यांनी तर थेट मुंबई बसून जंतरमंतरवरील आंदोलकांसाठी फूड डिलिव्हरी पाठवली....

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजधानी दिल्लीतच जायला हवं असं नाही. तर घरी बसूनही या आंदोलनाला कोणत्या कोणत्या स्वरूपात पाठिंबा देता येऊ शकतो हेच या ऑनलाईन फूड फडिंगनं दाखवून दिलंय. यामुळे आंदोलकांना कमालीचं बळ मिळालंय एवढं मात्र नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दक्षिणेत मराठीचा डंका! तामिळनाडूमध्ये २३ सप्टेंबरला ऐतिहासिक साहित्य संमेलन

विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर राजकारण नको; काँग्रेसच्या राज्यातही पेपरफुटी, भाजपचा आरोप

सोनम वांगचुक यांची हॉस्पिटलमधून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मै अभी..; VIDEO

Maharashtra News Live Update: चित्रपटाच्या शूटिंगसाठी अभिनेत्याला थेट साई समाधीवर बसवले.

दिल्लीतील लाठीचार्जविरोधात विरोधक आक्रमक, संसदेत काळे कपडे घालून विरोधकांकडून निषेध

SCROLL FOR NEXT