Narendra Modi news Saam tv
देश विदेश

PM नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट; शत्रू राष्ट्रांचं कनेक्शन उघड

narendra modi news update : PM नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कटात सामील तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी संबंधित तरुणाला बिहारमधून अटक केली आहे.

Vishal Gangurde

पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्याचा कट

आरोपीच्या लॅपटॉपमध्ये शत्र राष्ट्राच्या एजन्सीचे मेसेज आढळले

पोलिसांकडून आरोपी अमनची कसून चौकशी सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याचं उघडकीस आलं आहे. त्यांची सुरक्षा भेदण्याच्या कट रचण्याच्या कारस्थानात सामील असलेल्या अमन तिवारी याला अटक केली आहे. त्याच्या लॅपटॉपमधून शत्र राष्ट्राच्या एजन्सीचे मेसेज देखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. बिहारच्या सिमरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आशा पडरी गावातून तिवारीला अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तिवारीला अटक करून कट उधळून लावल्याचे वृत्त 'नवभारत टाइम्स'ने दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या आशा पडरी गावातील अमन तिवारीने आंतरराष्ट्रीय एजेन्सीला मेसेज पाठवला होता. पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानंतर ते सतर्क झाले. अमन घरी परतत होता. त्यानंतर घरी आल्यानंतर जेवण करत होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याच्या घरात छापा टाकला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी अमनसहित तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. चौकशी झाल्यानंतर दोघांना सोडलं. त्यानंतर अमनला अटक केली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'अमन तिवारीने २०२१ साली कोलकाता विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. याच प्रकरणात कोलकाता आणि बक्सर पोलिसांच्या संयुक्त टीमने त्याला अटक केली. अमन तिवारीला अटक केल्यानंतर त्याच्या गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून लॅपटॉपसहित अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील जप्त केले आहेत. त्याचा तपास सुरू आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'अमन तिवारीने २०२१ साली कोलकाता विमानतळाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. याच प्रकरणात कोलकाता आणि बक्सर पोलिसांच्या संयुक्त टीमने त्याला अटक केली. अमन तिवारीला अटक केल्यानंतर त्याच्या गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून लॅपटॉपसहित अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील जप्त केले आहेत. त्याचा तपास सुरू आहे.

अमनला अटक केल्यानंतर ग्रामस्थ हादरून गेले आहेत. या प्रकरणात अमनची कसून चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या संपर्कात आणखी कोण कोण आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी देखील तपासली जात आहे. त्याच्या टार्गेटवर कोण कोणते नेते होते, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लोणावळ्यात अतिक्रमण हटवल्याच्या विरोधात व्यापाऱ्यांचे उपोषण

Yashwant Verma : हायकोर्टाच्या न्यायाधीशांचा राजीनामा; अचानक नेमकं काय घडलं? माहिती आली समोर

Tandalachi Bhakri: तांदळाची भाकरी कडक होतेय? वापरा ही १ ट्रिक, न थापता, उकड न काढता भाकरी होईल मऊसूत

Actor Divorce: प्रसिद्ध अभिनेत्याच्या आयुष्यात वादळ, ११ वर्षांनंतर संसार मोडणार? बायकोने दिले संकेत

भारताचा माजी क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड; क्रीडाविश्वात शोककळा

SCROLL FOR NEXT