Namo Bharat Express viral video controversy : धावत्या रॅपिड रेल्वे नमो भारत एक्सप्रेसमध्ये शाळकरी कपल यांनी अश्लील वर्तन केल्याचे समोर आले आहे. गाझियाबाद आणि मेरठ दरम्यान नमो भारत एक्सप्रेसमध्ये कपलने शरीरसंबंध ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कपलचे ४ व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. १ मिनिटांचा व्हिडिओमध्ये कपल शरीरसंबंध ठेवत असल्याचे दिसतेय. सोशल मीडियावर अनेकांनी यावरून टीकेची झोड उडवली आहे. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी घडल्याचे सांगितले जात आहे. (Couple Caught in Obscene Act on Running Rapid Rail, Video Goes Viral)
या प्रकरणावरून सोशल मीडियावर टीकेची झोड उडाल्यानंतर गाझियाबाद आणि मेरठ पोलिसांनी तपास सुरू केला. नमो भारतच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले CISF देखील या प्रकरणाचा तपास करत आहे. नमो एक्सप्रेसमधील आढळलेल्या कपलची शाळा गाझियाबाद परिसरात आहे. हे जोडपे गाझियाबादमधील दुहाई स्टेशनवरून नमो भारत ट्रेनमध्ये चढले. चढताच त्यांनी अश्लील वर्तन केले. ते मेरठ साउथ स्टेशनपर्यंत सुरू राहिले. कपलचे अश्लील चाळे सुरू असताना त्या कोचमध्ये फार कमी लोक होते. पण आत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत हा प्रकार कैद झाला. व्हायरल व्हिडिओमध्ये विद्यार्थिनी शाळेच्या गणवेशात दिसत आहे.
रॅपिड रेल्वे नमो भारत एक्सप्रेसमध्ये शरीरसंबंध ठेवतानाचे चार व्हिडिओ शुक्रवारी रात्री अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे पोलिस आणि प्रशासनाला कारवाई करावी लागली. एसएसपी डॉ. विपिन ताडा यांनी सांगितले की, व्हिडिओंची सत्यता, घटनेचे ठिकाण आणि दोघांची ओळख तपासण्यासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आल्याची माहिती एसपी विपिन ताडा यांनी दिली. व्हिडिओमध्ये दाखवलेली घटना गाझियाबाद परिसरात घडल्याचे तपासात समोर आलेय. त्यामुळे तेथे कायदेशीर कारवाई सुरू केली जाईल, असेही ताडा म्हणाले.
या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. कपलचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नमो भारत एक्सप्रेसमध्ये कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आले. ट्रेनमधील एका कर्मचाऱ्याने घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली नाही. त्याने सीसीटीव्ही फुटेज रेकॉर्ड केले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. हा गंभीर बेशिस्तपणा असल्याचे कारण देत कर्मचाऱ्याला तात्काळ बडतर्फ करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.