A tragic accident during an Instagram reel stunt claimed the life of a 15-year-old boy in Hubli, raising serious concerns over dangerous social media trends. Saam Tv
देश विदेश

रस्त्यावर स्टंट करणंं महागात पडलं; रील बनवताना भाजपच्या दिग्गज नेत्याच्या मुलाचा जागीच मृत्यू, राजकीय वर्तुळात हळहळ

Bjp Leader Son Killed In Road Accident Hubli: इन्स्टाग्राम रील बनवताना स्टंट करत असताना १५ वर्षीय मुलाचा भीषण अपघातात मृत्यू झाला.

Omkar Sonawane

इन्स्टाग्रामवर रील्स व्हिडिओ चित्रित करत असताना एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव नमिष संगलद असून तो स्थानिक भाजप नेते वीरेश संगलद यांचा मुलगा होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यातील म्हैसूरमध्ये नववीत शिकणारा नमिष उगादी सण साजरा करण्यासाठी हुबळीला आला होता आणि या दरम्यानच त्याचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नमिश स्कूटर चालवत होता. त्याच्याच वयाचा दुसरा एक मुलगा महागडी गाडी चालवत होता. त्यांचे काही मित्र एक व्हिडिओ चित्रित करत होते. अचानक त्या दोघांचे ही त्यांच्या वाहनांवरील नियंत्रण सुटले आणि त्यांची टक्कर झाली. धडक इतकी जोराची होती की नमिश २० फूट हवेत फेकला गेला. नमिशला गंभीर दुखापत झाली आणि त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे भाजप नेते वीरेश सांगल यांच्यावर दुखाचा डोंगर कोसळला असून राजकीय वर्तुळात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

हुबळी-धारवाडचे पोलीस आयुक्त एन. शशिकुमार यांनी सांगितले की, रीलच्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या अपघातात एका लहान मुलाचा मृत्यू झाला. त्यांनी स्पष्ट केले की, कार आणि बाईक चालवणारे दोन्ही मुल एकमेकांचे मित्र होते. स्टंट करत असताना कार आणि बाईकची टक्कर झाली आणि अचानक ब्रेक लावल्याने हा भीषण अपघात घडला.

कायदेशीर कारवाईचा इशारा

पोलीस आयुक्तांनी सांगितले की, असे व्हिडिओ तयार करणाऱ्यांना सावध करण्यासाठी आणि त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी पोलीस विभाग कार्यरत आहे. सोशल मीडियावर असे व्हिडिओ पोस्ट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात, तरी देखील अशा घटना घडताना दिसताय. आयुक्तांनी जनतेला लहान मुलांना वाहने देऊ नयेत असे आवाहन केले असून मुलांना गाडी चालवू देणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: ...कंबरड्यात लाथ घालायला पाहिजे...; भोंदूबाबा खरातचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता संतापला

Video : मैं मराठी नही बोलूंगी...मुंबई विमानतळावर कर्मचारी तरुणीचा प्रवाशासोबत वाद; Video व्हायरल

Maharashtra Live News Update: पंढरपुरात वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष बागेचे नुकसान

Simple Saree Designs: उन्हाळ्यात सुंदर दिसण्यासाठी सिंपल साड्यांचे हे 5 पॅटर्न

मोठा निर्णय! मुंबईच्या ३ बड्या IAS अधिकाऱ्यांना अचानक राज्याबाहेर धाडलं; महत्त्वाची जबाबदारी सोपवली, कारण काय?

SCROLL FOR NEXT