मुंगेर (बिहार) : एक महिला तिच्या लहान मुलासह चालत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उतरत असताना तोल जाऊन रेल्वेखाली आली. भयावह अश्या या प्रसंगात दैव बलवत्तर म्हणून चमत्कारिकरीत्या वाचली आणि "देव तारी त्याला कोण मारी" या म्हणीचा प्रत्यय आला.धावत्या रेल्वेत चढू नये अथवा खाली उतरु नये अशी सूचना प्रत्येक प्लॅटफॉर्मवर दिलेली असते. या प्रकारे रेल्वेतून उडी मारल्यास कायमचं अपंगवत्व येण्याचा धोका देखील असतो. तसेच अश्या प्रसंगात प्राणही जाऊ शकतात. या सूचना सतत देऊनही अनेकदा अश्याच प्रकारच्या घटना घडत असतात.
सध्या सोशल मीडियावरही अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेने तिच्या लहान मुलासह रेल्वे सुरु झाल्यानंतर प्लॅटफॉर्मवर उडी घेतली व त्यानंतर तोल जाऊन ती महिला तिच्या लहान मुलासह रेल्वेच्या खाली आली. जवळपास दोन मिनिटे ती मुलासह रेल्वेच्या खालीच होती. पण सुदैवाने त्यांना काहीही झालं नाही. हि रेल्वे निघून गेल्यानंतर तिला बाहेर काढण्यात आलं. बिहारच्या जमालपूर रेल्वे स्टेशनवर ही घटना घडली आहे. गुरुवारी, 2 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजून 38 मिनिटांनी हा प्रकार घडला आहे.
हे देखील पहा -
जमालपूर स्टेशनवरुन भागलपूरला जाणाऱ्या लोकमान्य टिळक एक्स्प्रेसमधून प्रवासादरम्यान या महिलेने तिच्या लहानग्या मुलासह प्लॅटफॉर्मवर उडी मारली व तोल गेल्याने ते दोघेही रेल्वे खाली आले. प्लॅटफॉर्मवरील आरपीएफ आणि जीआरपी स्टाफने त्यांच्या संरक्षणास्तव धाव घेतली. पण तोपर्यंत ती महिला आणि ते लहान मूल रेल्वेच खाली आले होते. या घटनेने काही काळ जमालपूर स्टेशनवरील सर्वच प्रवाश्यांच्या काळजाचा ठोका चुकवला होता. महिला आणि तिच्या मुलाच्या जीवाचं काय झालं असेल? अशीच भीती हा प्रसंग पाहणाऱ्या सर्वांच्या मनात होती. मात्र, काळ आला होता पण वेळ नाही असाच काहीसा प्रकार या माय-लेकराच्या बाबतीत घडला आणि पुढचा अनर्थ टळला.
दरम्यान, हि महिला रेल्वेखाली आल्यानंतर प्लॅटफॉर्मवरील आरडाओरड ऐकून रेल्वे पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी तातडीने रेल्वे थांबवून त्या दोघांना सुखरूपरीत्या बाहेर काढले तेव्हा सर्वांनीच सुटकेचा निःश्वास टाकला. या महिलेचे पारो देवी (३५) असे नाव आहे. या घटनेनंतर धावत्या रेल्वेत चढू किंवा उतरण्याचे धाडस कुणीही करु नका, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा केले आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.