वृत्तसंस्था : मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा २६/११ मुख्य सूत्रधार असलेला हाफीज सईद याच्यासह त्याच्या ६ सहकाऱ्यांची लाहोर हायकोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. या सर्वांवर टेरर फंडिंगप्रकरणी खटला चालू होता. लाहोर हायकोर्टाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करत हा निर्णय दिला आहे. हे सर्व ६ जण पाकिस्तान मधील जमात- उद- दावा या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत.
हे देखील पहा-
लष्कर- ए- तोयबाचा संस्थापक हाफिज यानेच 'जमात'ची स्थापना करण्यात आली आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात लाहोर मधील दहशतवाद विरोधी सत्र न्यायालयाने मलिक जाफर इक्बाल, याहया मुजाहिद, नसरुल्लाह, शामीउल्लाह आणि उमर बहादूर यांना ९ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. याचबरोबर हाफिज सईदला ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील सुनावण्यात आली होती.
यामध्ये मलिक जाफर इक्बाल, याहा मजाहिद, उमर बहादूर याचा समावेश आहे. दरम्यान, हाफिज सईदला ६ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती पंजाब पोलिसांच्या काउंटर टेररिझम डिपार्टमेंटने CTD ही माहिती दिली आहे. कुख्यात दहशतवादी टेरर फंडिंग केसमध्ये दोषी आढळले होते. यामध्ये पैसा गोळा करणे आणि तो लष्कर- ए- तोयबाच्या खात्यात वर्ग करण्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
याद्वारे प्रतिबंधित दहशतवादी संघटनेला बेकायदेशीरपणे वित्तपुरवठा केला गेला आहे. दरम्यान ट्रायल कोर्टाने 'जमात'च्या सदस्यांना टेरर फंडिंड संबंधित आरोपांमध्ये दोषी ठरवले आहेत. तसेच टेरर फंडिंगमधून गोळा केलेल्या निधीतून तयार केलेल्या मालमत्ता जप्तीचे आदेश देण्यात आले होते.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.