Karmal Ghat Accident Saam tv
देश विदेश

Karmal Ghat Accident: गोव्याची ट्रिप अखेरची ठरली; करमल घाटात मुंबईच्या तरुणाचा अपघाती मृत्यू

गोव्यातील करमल घाटात कारच्या अपघातात एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

Karmal Ghat Accident News: गोव्यातील करमल घाटात कारच्या अपघातात एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. कार टँकरला धडकून दरीत कोसळ्याने मोठा अपघात झाला आहे. अरुण गांधी (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे . या अपघातात ४ जण जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

मुंबईच्या अंधेरीतील पाच मित्र कारमधून फिरण्यासाठी गेले होते. या पाच जणांनी मडगावहून भाडेतत्वावर एक बुक केली होती. त्याने हे मित्र गोव्यात प्रवास करत होते. सर्व मित्र सोमवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास पाकोळे येथून मडगावच्या दिशने निघाले होते.

करमल घाटात धोकादायक वळणावर कार पोहोचली. त्याचवेळी भरधाव टँकरने कारला जोरदार धडक दिली. टँकरच्या धडकेत कार १० मीटर खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात १९ वर्षीय अरुण गांधीचा जागीच मृत्यू झाला आहे.

या अपघातात मेद पाटवा (१९), अमेय जनत्रे (१९), सिया चोरडीया (१९) आणि सेहावी लोढा हे जखमी झाले आहेत. अपघातामधील जखमींना काणकोणच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सांगलीत क्रेनखाली चिरडून सायकलस्वार ठार

सांगलीच्या (Sangli) मिरजेत क्रेन खाली चिरडून एक सायकलस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने क्रेनवर दगडफेक केली. क्रेन चालकाने कानात हेडफोन घातल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मिरज शहरातील कृष्णा घाट रस्त्यावरील बेळगाव गेट रेल्वे मार्गावर ही घटना घडली आहे. यामध्ये सायकलस्वार महमद आलिसाब इनामदार वय 60 या वृद्धाचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen tips: हात खराब न करता चपातीचं पीठ कसं भिजवाल? पाहा एक सोपा देसी जुगाड

Ram-Leela Movie: रामलीला चित्रपटासाठी दीपिका पदुकोण नव्हती पहिली पसंती; तर या प्रसिद्ध अभिनेत्रीला  करण्यात आला होता रोल ऑफर...

Bajarang Sonawane : बीड जिल्ह्यात लोकसभेची पुनरावृत्ती निश्चित; खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास

Bank Job: इंडियन बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु, पगार किती? जाणून घ्या

VIDEO : खासदार प्रणिती शिंदे आणि आमदार कल्याणशेट्टी यांच्यात वाकयुद्ध | Marathi News

SCROLL FOR NEXT