Mulayam Singh Yadav Funeral
Mulayam Singh Yadav Funeral Saam TV
देश विदेश

Mulayam Singh Yadav Funeral: मुलायम सिंह यादव अनंतात विलीन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mulayam Singh: समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह (Mulayam Singh) यादव यांच्यावर आज देशातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. मुलायम सिंह यांचे सुपुत्र आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी त्यांना मुखाग्नी दिला.

मागील काही दिवसांपासून आजारी असणाऱ्या मुलायम सिंह यादव यांनी काल सोमवारी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर उत्तर प्रदेश सरकारने धरतीपुत्र मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर ३ दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. (Uttar Pradesh)

पाहा व्हिडीओ -

दरम्यान, मुलायम सिंह यांच्यावर आज त्यांच्या सैफई या गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंचा संख्येने नागरिक उपस्थित होते. सैफईमध्ये यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य यांच्यासह सर्व पक्षांच्या नेत्यांनी सिंग यांचे अंतिमदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

दरम्यान, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, प्रमोद तिवारी यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे हे देखील मुलायम सिंह यादव यांच्या अंत्यसंस्कारला उपस्थित होते. मुलायम सिंह हे उत्तर प्रदेशचे ३ वेळा मुख्यमंत्री आणि 1996 ते 98 या काळात देशाचे संरक्षण मंत्री देखील होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री करतो असं उद्धव ठाकरे मला म्हणाले होते, एकनाथ शिंदेंचा आणखी एक गौप्यस्फोट

Vishal Patil vs Jayant Patil: उमेदवारीचा किस्सा, आरोप, प्रत्यारोप आणि जयंत पाटील यांचं मोठा खुलासा!

Thane Lok Sabha: नरेश म्हस्केंविरोधात नाराजी! भाजपच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांचं 'मास रिझाईन'

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण शरण सिंह यांना झटका, भाजपने कापलं तिकीट; मुलाला दिली उमेदवारी

Vishal Patil हे भाजपची 'बी' टीम, Chandrahar Patil यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT