Sonai Gandhi, Supriya Sule
Sonai Gandhi, Supriya Sule Saam Tv
देश विदेश

सोनिया गांधी-स्मृती इराणी यांच्यात शाब्दिक चकमक, सुप्रिया सुळेंनी सांगितले त्यावेळी काय घडले?

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी वादात सापडले. यावरून संसदेत जोरदार गदारोळ झाला. भाजपने संसदेच्या सभागृहात काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि स्मृती इराणी सभागृहात आमनेसामने आल्या. सभागृह तहकूब झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी स्मृती इराणी यांना 'डोंट टॉक टू मी' असं म्हटले असल्याचा भाजप नेत्यांनी दावा केला आहे, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या संपूर्ण घटनेत खासदार सुप्रिया सुळे साक्षीदार होत्या. या संदर्भात सभागृहात नेमक काय घडले? याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. (Sonia Gandhi- Smriti Irani News Update)

'आज जे काही झाले ते दुर्दैवी आहे. संसदेत जे काही झाले ते आम्ही संसदेत विसरत असतो. सोनिया गांधी (Sonia Gandhi) हाऊसमधून निघून जात होत्या. यावेळी सत्तेतील खासदारांनी घोषणाबाजी सुरू केली. मोठा आवाज येत होता. त्यावेळी त्या खासदार रमादेवी यांच्या जवळ निघाल्या होत्या. यावेळी सोनिया गांधी कुणाशीच बोलत नव्हत्या. यावेळी मी त्यांना विनंती केली, आपण इथून निघून जाऊया. मी त्यावेळी त्यांना त्यांच्या कारजवळ सोडून आलो, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

यावेळी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी कुणालाही काही म्हटलेले नाही. सत्ताधाऱ्यांना महागाईवर चर्चा करायची नाही. सभागृहात अशी गडबड होऊ नये. याअगोदर असे कधीच घडले नव्हते. यावेळी सोनिया गांधींनीही माझे ऐकले. अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले आहे, हे माझ्याकडून चुकून गेले आहे, माझी हिंदी चांगली नाही. मला असे काहीही बोलायचे नव्हते, असे अधीर रंजन चौधरी यांनी मला सांगितले, असंही खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

सोनिया गांधी-स्मृती इराणी यांच्यात शाब्दिक चकमक

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी वादात सापडले. यावरून संसदेत जोरदार गदारोळ झाला. भाजपने संसदेच्या सभागृहात काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी इराणी यांनी केली. त्याचदरम्यान संसदेतील वातावरण तापलं. दुसरीकडे, सोनिया गांधी आणि स्मृती इराणी सभागृहात आमनेसामने आल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी संसदेच्या सभागृहातील अनेक सदस्यांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. (Sonia Gandhi- Smriti Irani News Update)


लोकसभेच्या सभागृहात (Loksabha) साधारण १२ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. सभागृहाचं कामकाज स्थगित झाल्यानंतर भाजपचे खासदार हे सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या घोषणा करत होत्या. सोनिया गांधी त्याचवेळी सभागृहातून बाहेर जात होत्या. मात्र, घोषणाबाजी सुरू असल्याने सोनिया परत आल्या आणि रमा देवी यांच्याजवळ गेल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

Astro Tips: आपण देवी-देवतांच्या मंदिराला प्रदक्षिणा का मारतो? काय आहे कारण?

Ratnagiri Tourist: उन्हाळ्याची सुट्टी घालवा रत्नागिरीत; 'ही' ७ ठिकाणे आहेत खास

Maval Lok Sabha: मावळचा गड राखण्यासाठी महायुतीचा प्लॅन काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT