Supriya Sule
Supriya Sule Saam Tv
देश विदेश

मराठी कविता ऐकवत सुप्रिया सुळेंचा महागाईवरुन हल्लाबोल; सगळ्यांनीच ऐकावं असं तुफान भाषण

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पहिल्या दिवसापासूनच सभागृहात गोंधळ सुरू झाला. आज सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब झाले. यानंतर लोकसभेत महागाईच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महागाईवरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दूध, ताक, पनीर यावरील लावलेल्या जीएसटीवरुन केंद्रावर टीका केली.

दत्त दत्त दत्ताची गाय, गायीचे दूध, दूधाची साय, सायीचं दही, दहीचे ताक, ताकाचे लोणी, लोण्याचे तुप यात आता दत्त गुरु आणि गाय दोन्ही सोडून तुम्ही सगळ्यांवर जीएसटी लावला आहे, अशी जोरदार टीका आज लोकसभेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महागाईवरुन केंद्र सरकारवर केली आहे.

आज बँकेत साधे खाते काढले तरी खर्च सामान्यांचा जास्त होतो. नागरिकांचे स्वत:चे पैसे काढण्यासाठी पैसे खर्च करावे लागत आहेत. सध्या बँकेतीलही खर्च वाढले आहेत. चेकबुक, एटीएम कार्ड घेण्यासाठी खर्च होता. नोटाबंदी करुन काय मिळवले. गॅसचे दरही भरमसाठ वाढले आहेत. तुम्ही जीएसटी लागू करता तेव्हा राज्यांचे मत घेत नाहीत, असा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने जीएसटी संदर्भात केंद्र सरकारला प६ही पाठवले होते, असंही खासदार सुळे (Supriya Sule) म्हणाल्या.

हे देखील पाहामहा

आपल्या महिला अर्थमंत्री आहेत, त्यांना महागाईचे सर्व माहिती आहे. पनीर, दही, तांदूळ, या सगळ्यांवर जीएसटी लावला. आता यावर ते म्हणतीस जीएसटी काँन्सीलने केले आहे. तुम्ही सर्व गोष्टी जीएसटी काँन्सीलमध्ये पास होतात त्या करता का, मेजॉरीटी तुमचीच आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana: पळशी झाशी गावात अघोरी विद्येचा प्रकार, पाणी पिण्यास ग्रामस्थांमध्ये भीती, नेमकं काय घडलं?

MI vs SRH,IPL 2024: वानखेडेवर आज मुंबई- हैदराबाद भिडणार! पाहा प्लेइंग ११, पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड

Shirpur News : गुटख्याची अवैध वाहतूक; २८ लाखाचा मुद्देमाल जप्त

Govinda Maval Lok Sabha News | गोविंदा नेमकं कोणासाठी आला हेच विसरला अन् बुचकळ्यात पडला

ICSE Bord Result: आयसीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT