India Alliance Protest Saam Tv
देश विदेश

INDIA Alliance Protest: विरोधकांच्या मोर्चादरम्यान महिला खासदार बॅरिगेट्सवर चढल्या, घोषणाबाजी करताना दोघी चक्कर येऊन पडल्या

Delhi Protest: दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या मोर्चादरम्यान दोन महिला खासदारांना चक्कर आल्याची घटना घडली. या महिला खासदार मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि जोरदार घोषणाबाजी करत होत्या. यावेळी बॅरिगेट्सवर चढून घोषणा देत असताना त्यांना चक्कर आली.

Priya More

इंडिया आघाडीच्या नेते आणि खासदारांनी आज राजधानी दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा काढला होता. संसद भवनापासून ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. पण पोलिसांनी हा मोर्चा मध्येच अडवला. यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आणि खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत बॅरिगेट्सवर चढून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला खासदार देखील बॅरिगेट्सवर चढून घोषणाबाजी करत होत्या. यावेळी त्रिनमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोत्रा आणि खासदार मिताली बाग या बेशुद्ध पडल्या. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांनी संसदेच्या मकर गेटपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चामध्ये राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे ३०० खासदार सहभागी झाले होते. बिहारमधील निवडणुकांसाठी विशेष सारांश सुधारणा (SIR) आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची फसवणूक झाल्याचा आरोप करत इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आल्या.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की, या मोर्चासाठी कोणतीही परवानगी घेतली गेली नाही म्हणून खासदारांना मोर्चा पुढे नेण्यास रोखण्यात आले. कॉंग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगरी म्हणाले की, अशी परवानगी कधीच दिली जात नाही आणि पोलिस सरकारच्या सूचनेवर कारवाई करीत आहेत. समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव यांनी नुकताच उत्तर प्रदेशातील निवडणुका ताब्यात घेतलेल्या बूथवर आरोप केला. आरजेडीच्या मनोज झा यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरही निवडणूक आयोगाने डेटा लपविल्याचा आरोप केला.

दरम्यान, मोर्चा दरम्यान राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी बॅरिगेट्सवर चढून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी राहुल गांधी, संजय राऊत, प्रियांका गांधीसह अनेक खासदारांना ताब्यात घेतलं. या सर्वांना पोलिसांच्या व्हॅन आणि बसमध्ये बसवून संसद भवनामध्ये नेऊन सोडण्यात आले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर देखील नेत्यांनी आणि खासदारांनी घोषणाबाजी करणं सुरूच ठेवलं. नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Express: गुड न्यूज! ४ नव्या वंदे भारत एक्सप्रेस होणार सुरू, वाचा कुठून कुठे धावणार, काय असेल मार्ग?

अंबानींवरचा फास आवळला, मुंबई ते दिल्ली 7,500 कोटींची संपत्ती जप्त|VIDEO

Maharashtra Live News Update: पुणे नाशिक महामार्गावरील रास्ता रोको तूर्तास स्थगित

Weird dreams during fever: ताप आल्यावर भयानक स्वप्नं का पडतात? जाणून घ्या यामागील सायन्स

Women's World Cup 2025: भारताच्या लेकी वर्ल्ड चॅम्पियन्स; हरमनप्रीतच्या टीम इंडियानं रचला इतिहास

SCROLL FOR NEXT