Kangana Ranaut In Maharashtra Sadan Saam Tv
देश विदेश

Kangana Ranaut Video: कंगना रणौतची महाराष्ट्र सदनाकडे अजब मागणी, मुख्यमंत्री शिंदेंशी काय आहे कनेक्शन?

Maharashtra Sadan: अभिनेत्री खासदार कंगना राणावतची महाराष्ट्र सदनकडे अजब मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांचा सूट कंगनाने मागितला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Pramod Subhash Jagtap

यशस्वी अभिनय कारकीर्दीनंतर कंगना रणौत या आता राजकारणाकडे वळल्या असून नुकतीच हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून त्यांनी सार्वत्रिक निवडणूक जिंकली आहे. यातच आज त्यांनी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली आणि लोकसभा सदस्य म्हणूनही शपथ घेतली. यानंतर त्या दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गेल्या होत्या.

महाराष्ट्र सदनात अभिनेत्री खासदार कंगना रणौत यांनी अजब मागणी केली आहे. त्यांनी महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांसाठी राखीव असलेल्या सूटची मागणी केली आहे. अशी माहिती, सूत्रांनी दिली आहे. काही वेळापूर्वीच कंगना यांनी महाराष्ट्र सदनात येऊन रूमची पाहणी केली होती.

महाराष्ट्र सदनाने दिला नकार

इतर रूम छोट्या असल्याने थेट मुख्यमंत्री सुट मिळावा, म्हणून कंगना यांनी मागणी केली होती. सदनातूनच महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याला कंगना यांनी फोनही केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा सूट दिला जाणार नाही, असं स्पष्टीकरण महाराष्ट्र सदनाकडून देण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

कंगना काय म्हणाल्या?

याचबद्दल कंगना रणौत यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ''महाराष्ट्र सदन सर्वात सुंदर आहे. माझे येथे काही मित्र आहेत, म्हणून मी येथे चहापानासाठी आली होती. महाराष्ट्र माझं घर आहे. येथे माझे खूप मित्र आहेत. म्हणून मी भेट घेण्यासाठी आली होते.''

दरम्यान, हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणारी कंगना या प्रत्येक मुद्द्यावर स्पष्ट मत व्यक्त करण्यासाठी ओळखल्या जातात. मंडी लोकसभा जागेसाठी कंगना रणौत यांची काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या विक्रमादित्य सिंह यांच्याशी थेट लढत झाली होती. मात्र मंडीतील जनतेने कंगना राणौत यांच्यावर विश्वास दाखवत आणि त्यांना 74755 मतांनी विजयी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

SCROLL FOR NEXT