CM Convoy Car Failed In Ratlam 
देश विदेश

अरं देवा! चक्क मुख्यमंत्र्यांनाच फसवलं; ताफ्यातील १९ गाड्यांमध्ये डिझेलऐवजी पाणी भरलं

CM Convoy Car Failed In Ratlam: मुख्यमंत्र्यांच्या ताफा रतलाम येथे एमपी राईज २०२५ कॉन्क्लेव्हसाठी रवाना झाला होता. या ताफ्यातील १९ इनोव्हा कार अचानक बंद पडल्या. वाहनांची तपासणी केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.

Bharat Jadhav

पेट्रोल पंपावरील पेट्रोल किंवा डिझेलमध्ये पाण्याचाही अंश असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं आपण पाहिले असेल. मिश्रित पेट्रोल-डिझेल विकलं जात असल्याची तक्रार अनेकवेळा नागरिक करत असतात, पण विचार करा जेव्हा स्वत: मुख्यमंत्र्यांनाच पेट्रोल पंपवाल्यानं फसवलं तर. त्यांच्या ताफ्यातील गाड्यांमध्ये डिझेलऐवजी पाणी भरलं तर, हे वाचून तुम्हा सगळ्याच्या भुवया उंचावल्या असतील ना, पण हो तुम्ही जे वाचलं ते खरंच घडलंय.

पाणी मिश्रित डिझेल भरल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा ताफ्यातील तब्बल १९ गाड्या अचानक बंद झाल्या. गाड्या अचानक बंद झाल्यानंतर मोठी खळबळ उडली होती. वाहनांची तपासणी केल्यानंतर धक्कादायक हा प्रकार समोर आलाय. मध्य प्रदेशातील रतलाम येथे झालेल्या औद्योगिक परिषदेदरम्यान एक मोठा निष्काळजीपणा समोर आलाय.

मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या ताफ्यातील डझनभराहून अधिक वाहने अचानक वाटेत बंद पडली. सुरुवातीला ही तांत्रिक बिघाड वाटत होता, पण जेव्हा वाहनांची तपासणी केली तेव्हा त्या गाड्यांमध्ये पाणी मिश्रित डिझेल भरल्याचं आढळून आलं. मिळालेल्या माहितीनुसार, दोसीगाव येथील पेट्रोल पंपावरून या सर्व वाहनांमध्ये डिझेल भरण्यात आले होते. या घटनेनंतर प्रशासनात खळबळ उडाली. तात्काळ कारवाई करत संबंधित पेट्रोल पंप सील करण्यात आला आहे. त्यानंतर इंधनाचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

ज्या वाहनांमध्ये २० लिटर डिझेल भरले होते, त्या वाहनांमधून सुमारे १० लिटर पाणी बाहेर पडल्याचे तपासात समोर आले. जवळजवळ सर्वच वाहनांमध्ये ही स्थिती आढळून आली. एका ट्रक चालकाने २०० लिटर डिझेलही भरले होते, जे थोड्या अंतरावर गेल्यानंतर बंद पडले होते. प्रशासनाच्या सुरुवातीच्या तपासात पावसामुळे डिझेल टाकीमध्ये पाणी गळती झाली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात आलीय.

दरम्यान पेट्रोल पंपांवर इंधनाची गुणवत्ता तपासण्यासाठी काय व्यवस्था आहे आणि असे भेसळयुक्त इंधन सामान्य लोकांनाही दिले जात आहे का, असे प्रश्नही उपस्थित केले जाताहेत. दरम्यान जिल्हाधिकारी या प्रकरणाची तपासणी करत आहेत. इंधनाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत, याचा अहवाल मिळाल्यानंतर दोषींवर कारवाई केलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी

Beed : शेतकऱ्यांच्या कपाशी पिक भुईसपाट; बहिणीचे लग्न करायचं कसं, शेतकऱ्यांनी फोडला टाहो

Solapur Flood : “पावसामुळे पिके बुडाली, माझ्या कुटुंबाची काळजी घ्या”, सोलापुरात अतिवृष्टीमुळे २ शेतकऱ्यांची आत्महत्या

Beed Crime: बीड पुन्हा हादरले! पत्रकाराच्या मुलाची निर्घृण हत्या, भरचौकात चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं

5G Smartphones: कमी किमतीत स्वस्तात स्वस्त मोबाईल, १० हजार रुपयांखालील सर्वोत्तम ५जी स्मार्टफोन्स

SCROLL FOR NEXT