मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. यात ८ जणांचा जीव गेला असून ८० जण गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे भूकंपसदृश्य स्थिती निर्माण झालीय. स्फोटामुळे ४० किलोमीटरपर्यंत कंप जाणवले. स्फोटाचे आवाज ऐकल्यानंतर लोक आपले वाहनं सोडून धावू लागले होते. तर साधरण घरे कोसळली. घरांवरील आणि रुग्णालयाच्या खिडक्यांवरील काचा फुटल्या. स्फोट झालेल्या ठिकाणी आगीने विळखा घातला असून सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळत आहे.(Latest News)
प्राथमिक माहितीनुसार, आज सकाळी साडेअकरा वाजता मध्यप्रदेशात असलेल्या बैरागड गावातील मगरधा रोडवरील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. या भीषण स्फोटात ८ जणाचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा वाढत असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. राज्याचे वाहतूक मंत्री उदय प्रताप सिंग यांनी घटनास्थळाची पाहणी केलीय. ८ जणांचा या स्फोटात मृत्यू झाला असून अजून मृतांचा आकडा वाढणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री मोहन यादव, मंत्री उदय प्रताप सिंह यांनी डीजी अरविंद कुमार आणि एसीएस अजित केसरीसोबत फटाके कारखान्याचे हवाई सर्वेक्षण केले.
दरम्यान या घटनेविषयी स्थानिक संतोष कसदे यांनी आपबीती सांगितलीय. सकाळी साडेअकरा वाजता फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला. त्यामुळे या कारखान्यापासून ८०० मीटर अंतरावर असलेल्या घंटाघर बाजारात होतो. स्फोटचा आवाज ऐकल्यानंतर नागरिक कारखान्याकडे धावू लागले. ११.४० वाजता मोठा स्फोट झाला तेव्हा आरोडाओरड सुरू झाली. जे लोक मदतीसाठी कारखान्याकडे धावले होते तेच परत मदत मिळावी म्हणून परत बाजाराकडे पळू लागले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
स्फोटामुळे घंटा बाजारात खळबळ माजली. व्यापारी लोक दुकाने बंद करून पळू लागली. तर ग्राहक आपले वाहनं सोडून पळू लागली. काय मिनिटातच बाजार खाली झाल्याचं कसदे म्हणाले. स्फोटामुळे दगड, लोखंडी व टिनाचे तुकडे ५०० मीटर दूरपर्यंत उडाले. अनेकजण यामुळे जखमी झाले. उडणारा दगड कोणाच्या तरी डोक्यावर लागला, तर टिनाच्या शेडमुळे कोणाचा हात कापला गेल्याचे कसदे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.