Russia-Ukraine War Saam Tv
देश विदेश

Russia-Ukraine War: युक्रेनमधून 270 च्यावर भारतीय विद्यार्थ्यांना रोमानियात हलवले, विद्यार्थ्यांनी मानले सरकारचे आभार

युक्रेनच्या चर्नोव्हस्की आणि आसपासच्या भागातील 270 च्यावर विद्यार्थ्यांना युक्रेनला लागूनच असलेल्या रोमानिया या देशात हलवले आहे.

अरुण जोशी

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनसोबत युद्ध सुरु केल्यानंतर तिथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले शेकडो भारतीय विद्यार्थी अडचणीत आलेले आहेत. यात अमरावती जिल्ह्यातील 8 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र, युक्रेनमधील भारतीय दुतावास आणि भारत सरकारने तातडीने पावले उचलत युक्रेनच्या चर्नोव्हस्की आणि आसपासच्या भागातील 270 च्यावर विद्यार्थ्यांना युक्रेनला लागूनच असलेल्या रोमानिया या देशात हलवले आहे (More than 270 Indian students relocated to Romania from Ukraine).

रोमानिया (Romania) च्या सीमेवर रोमानियन जनतेने भारतीय विद्यार्थ्यांना जेवणाची सुद्धा सोय केली आहे. अमरावती (Amravati) येथील साहीर तेलंग या विद्यार्थ्याने तेथील दृश्ये पाठवली आहेत. भारत सरकारने तातडीने पावले उचलले आणि सर्व विद्यार्थ्यांना युक्रेनवरुन आणण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी भारत सरकार (Government Of India) आणि युक्रेन (Ukraine) मधील भारतीय दुतावासाचे आभार या विद्यार्थ्यांनी मानले आहेत. उद्या किंवा परवा या विद्यार्थ्यांना भारतात आणले जाणार आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणणार

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने युक्रेनला विमानं पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने तयारीही सुरु आहे. तसेच, युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या परतीचा खर्चही भारत सरकार उचलणार आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

SCROLL FOR NEXT