Mum accidentally lists her baby for sale on Facebook Facebook
देश विदेश

विक्रीसाठी बाळासह पाेस्ट; नेटीझन्स चक्रावले, नेमकं 'हे' घडलं

साम न्यूज नेटवर्क

सातारा : घरबसल्या एखाद्या वस्तुची विक्री करावयाची असल्यास समाज माध्यमाचा (social media) अनेक जण खूबीने वापर करतात. परंतु त्याचा वापर करताना गडबड झाल्यास अनेकदा मनस्ताप हाेण्याचे प्रकार घडल्याचे आपल्या कानावर नेहमी येतं. अशीच गडबड लुसी बॅटल हिने केली आणि त्यानंतर ती दुखी झाली. mum accidentally lists her baby for sale on facebook

लुसी बॅटल ही २० वर्षीय युवती सात महिन्यांपुर्वी आई झाली. आपल्या बाळासमवेत तिने अनेक छायाचित्र काढली. दरम्यान तिला तिचे जुना सोफा विकायचा हाेता. त्यासाठी तिने फेसबुकची मदत घेण्याचे निश्चित केले. साेफ्याचे छायाचित्र तिने फेसबुकच्या (facebook) मार्केटप्लेसमध्ये पोस्ट करताना आजच द्यायचे आहे असे नमूद केले. हे छायाचित्र पाेस्ट करताना तिच्याकडून अनावधाने आपल्या सात महिन्यांच्या ऑस्करचे (बाळाचे) छायाचित्र त्यामध्ये जाेडले गेले.

लुसीचे पाेस्ट पाहून अनेकांना धक्का बसला. त्या पाेस्टवर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. खरंतर पोस्ट केल्यानंतरही तिला काही काळ कल्पना नव्हती त्यात ऑस्करच्या हसतमुख छायाचित्राचा समावेश आहे.

या पाेस्टबद्दल अनेकंना नेमके काय विक्री करायचे आहे याची उत्सुकता लागून राहिली. काही फेसबुक युजर्सने या सुंदर बाळावरुन त्यांच्या किशोरवयीन मुलांची अदलाबदल करण्याबद्दलचे विनोदी कमेंटस लिहिल्या. तो इतर बाळांसारखा कसा आहे? असे एका वापरकर्त्याने लिहून खिल्ली उडवली.

या प्रकाराबाबत लुसी म्हणाली "मी माझ्या जुन्या सोफ्याचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला कारण माझ्याकडे नवीन आला. मला जुना सोफा लवकरात लवकर घरातून बाहेर काढवयाचा हाेता. मला वाटले की ज्याला त्याची गरज आहे त्याला मी ताे लगेच देईन. मी फोन मधील कॅमेरातील छायाचित्र पाहत होते. त्यापैकीच ऑस्करसह एक पाेस्ट झाले असावे. प्रारंभी लोकांच्या प्रतिक्रिया पाहून मी गोंधळून गेले. परंतु नंतर मी पोस्टकडे गांभीर्याने पाहिले आणि माझ्या लक्षात आले मुख्य छायाचित्र साेफ्यासह ऑस्करचे म्हणजे माझ्या बाळाचे हाेते. खरंतर मला माझ्या या कृत्याची लाज वाटली यामुळेच मी संबंधित छायाचित्र पाेस्टमधून हटवला नाही असे लुसीने स्पष्ट केले.

दरम्यान गतवर्षी यूकेमधील एकाने डेटिंग ऍप्लिकेशन्सवर मैत्रीण (गर्लफ्रेंड) न सापडल्याने अखेर स्वतःलाचा फेसबुकवर विक्रीसाठी असल्याचे छायाचित्र पाेस्ट केले हाेते. त्यावेळी देखील खूप गाेंधळ उडाला हाेता. अलन क्लेटन असे त्याचे नाव. तो अनेक दिवसांपासून स्वतःसाठी मैत्रीण शाेधत हाेता. परंतु प्रत्येक वेळी त्याला अपयश येत हाेते. अखेरचा उपाय म्हणून त्याने 'आयटम्स फॉर सेल' फेसबुक ग्रुपवर स्वतःची जाहिरात करण्याचे ठरवले. पारंपारिक डेटिंग ऍप्लिकेशन्सवर नशीबाने साथ न दिल्याने त्याने स्वतःला 'मुक्त' आणि 'चांगली/वापरलेली स्थिती' असे म्हणत स्वत:ला विक्रीसाठी घाेषित केले हाेते.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सलमान खानला मारण्याची सुपारी घेणाऱ्याला पनवेल कोर्टात केलं हजर

Hansika Motwani Home: 'कोई मिल गया' फेम अभिनेत्रीच्या नवीन घराचे फोटो पाहिलेत का?

Karjat -Jamkhed Constituency: रोहित पवार आणि राम शिंदे आमने-सामने, कर्जत-जामखेडचे राजकारण तापलं

Diwali Sweet Dish Recipe : दिवाळी स्पेशल; साखरेएवजी 'हा' पदार्थ वापरुन बनवा हेल्दी लाडू

VIDEO : विधानसभेच्या तोंडावर थोरातांना मोठा धक्का !

SCROLL FOR NEXT