हाेळीच्या माळावर राष्ट्रपतींचे चाॅपर उतरेल : संभाजीराजे छत्रपती

होळीच्या माळावर हेलिकॉप्टर आम्ही उतरु देणार नाही असा पवित्रा येथील शिवप्रेमींनी घेतला आहे.
sambhajiraje chhatrapati
sambhajiraje chhatrapati
Published On

सातारा : राष्ट्रपती रामनाथ काेविंद (ramnath kovind) हे येत्या सहा डिसेंबरला किल्ले रायगडास भेट देणार आहेत. दरम्यान शिवप्रेमींनी रायगडवरील हाेळीचा माळ येथे हेलिकाॅप्टर उतरविण्यास विराेध दर्शविला आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकारचा एकही अधिकारी राष्ट्रपतींना राेप-वे मधून नेण्यासाठी परवानगी देत नाही. त्यामुळे राष्ट्रपती हे चाॅपरने (हेलिकाॅप्टर) रायगडावर येतील आहेत. हाेळीचा माळ येथे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा याेग्य पद्धतीने अच्छादित (कव्हर) करु जेणेकरुन धूळ वगैरे उडणार नाही असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नमूद केले.

sambhajiraje chhatrapati
देव काेणी पाण्यात ठेवले माहित नाही; उदयनराजे तुमच्यासमाेर उभा आहे

येत्या सहा डिसेंबरला राष्ट्रपती किल्ले रायगडला भेट देणार आहेत. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव हेलिकॉप्टर रायगड किल्ल्यावर उतरवले जाणार आहे. परंतु होळीच्या माळावर हेलिकॉप्टर आम्ही उतरु देणार नाही असा पवित्रा येथील शिवप्रेमींनी घेतला आहे. पूर्वी किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हेलिपॅड होते. या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरविताना किंवा उड्डाण घेताना मोठ्या प्रमाणात धुळ, माती, केर कचरा उडत असे. ही धुळ, माती होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर उडत असे. त्यामुळे सन १९९६ मध्ये येथे उपोषण करून येथील हेलिपॅड काढुन टाकण्यात आला आहे. आता पुन्हा २५ वर्षांनंतर शिवरायांच्या अवमानाचा तोच प्रश्न पुन्हा निर्माण होत असल्याने आम्हा सर्व शिवप्रेमींचा हाेळीचा माळ येथे हेलिकाॅप्टर उतरविण्यास विरोध असल्याचे नितीन पावले, सिद्धेश पाटेकर यांनी नमूद केले आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती sambhajiraje chhatrapati यांनी राष्ट्रपती रामनाथ काेविंद यांच्या किल्ले रायगड भेटीबाबतची माहिती मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत नुकतीच दिली. त्यावेळी त्यांनी किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर holicha mal in raigad हेलिकाॅप्टर उतरल्यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर धुळ उडू नये यासाठी संपुर्ण शिवपुतळा हा याेग्य पद्धतीने अच्छादीत करु असे म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com