Narendra Modi/ Shivsena SaamTV
देश विदेश

मोदींनी लाल किल्ल्यावरून 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी - संजय राऊत

नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आज देशातील बहुचर्चीत आणि वादग्रस्त कृषी कायदे (Agricultural laws) मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर सर्वच विरोधकांनी मोदी सरकार झुकलं म्हणत केंद्रावर टीका केल्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणीक -

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) आज देशातील बहुचर्चीत आणि वादग्रस्त तीन कृषी कायदे (Agricultural laws) मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर सर्वच विरोधकांनी मोदी सरकार झुकलं म्हणत केंद्रावर टीका केल्या. तसेच हे उशीरा सुचलेलं शहाणपण तर काहींनी उत्तर प्रदेशात येऊ घातलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती कायदे मागे घेतले असल्याची टीका केली. अशातच केंद्रावर परखड आणि टोकाच्या टीका करणारे शिवसेना खासदार संजय राऊत (ShivSena MP Sanjay Raut) यांनी तर मोदींना लाल किल्ल्यावरून 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून (Red Fort) 700 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची माफी मागावी तसेच त्यांना मदतीची घोषणा कर शेतकऱ्यांविरोधात केलेल्या केसेस मागे घेण्याची राऊतांनी आपल्या ट्विट (Tweet) मध्ये मागणी केली आहे.

केंद्र सरकारनं (Central Government) मंजूर केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या आंदोलनात कृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या दोखील (Farmers commit suicide) केल्या होत्या. दरम्यान गुरुनानक जयंतीनिमित्त आज पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. मोदींनी ते कृषी कायदे रद्द करीत शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. याच पार्श्वभूमीवरती राऊतांनी ट्वीट करत वरिल मागण्या केल्या.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

SCROLL FOR NEXT