मोदी सरकार ही निरोध बनवणारी कंपनी विकण्याच्या तयारीत; EOI ची डेडलाईन वाढवली Saam Tv
देश विदेश

मोदी सरकार ही निरोध बनवणारी कंपनी विकण्याच्या तयारीत; EOI ची डेडलाईन वाढवली

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - मोदी सरकार (Central Government) मूड्स कंडोम बनवणारी एचएलएल लाइफकेअर लिमिटेड कंपनी विकण्याच्या तयारीत आहे. या कंपनीच्या संभाव्य खरेदीदारांसाठी इच्छुक पत्रे सादर करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी पर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) सादर करण्याची अंतिम तारीख ही ३१ जानेवारी होती.

पात्र इच्छुक असलेल्या बोलीदारांना (QIBs) विभागाकडून कळवण्याची अंतिम तारीख देखील एक महिन्याने वाढवून 14 मार्च करण्यात आली आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM) ने 14 डिसेंबर रोजी आरोग्य क्षेत्रातील केंद्रीय सार्वजनिक उपक्रम (CPSE) मधील सरकारच्या 100 टक्के हिस्सेदारी विक्रीसाठी प्राथमिक बोली आमंत्रित केल्या होत्या.

हे देखील पहा -

HLL हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक उपक्रम आहे. HLL गर्भनिरोधक औषधे, महिलांची आरोग्यसेवा उत्पादने, रुग्णालयातील पुरवठा तसेच इतर उत्पादनांच्या निर्मिती करणारी कंपनी आहे.

HLL Lifecare Limited मध्ये सरकारचा पूर्ण मालकीचा हिस्सा आहे पण आता धोरणात्मक निर्गुंतवणुकीचा भाग म्हणून खाजगी हातात जाईल. ही कंपनी 1 मार्च 1966 रोजी Hindustan Latex Limited म्हणून अस्तित्वात आली. कंपनीचा पहिला प्लांट केरळमध्ये 1967 मध्ये स्थापन झाला. 2009 मध्ये, Hindustan Latex Limitedचे ​​नाव बदलून HLL Lifecare Limited असे करण्यात आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahayuti News: हरियाणा-जम्मूमुळे महाराष्ट्रात महायुतीला टेन्शन? भाजपला फटका, काँग्रेसची सत्ता येणार?

Bigg Boss 18: ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉस हिंदीच्या घरात धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या १६ सदस्यांची नावे

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

SCROLL FOR NEXT