MODI CABINET RESHUFFLE: FORMER IAS OFFICER APARAJITA SARANGI LIKELY TO GET MINISTERIAL BERTH saam tv
देश विदेश

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Modi Cabinet Expansion Soon : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी म्हणजेच पुढील महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

  • मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार

  • माजी आयएएस अधिकारी आणि भाजप खासदार अपराजिता सारंगी यांना मंत्रिपद मिळण्याची जोरदार चर्चा.

  • पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारकडून मोठे राजकीय निर्णय होण्याची शक्यता

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. २०२४ मध्ये सुरू झालेल्या मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच विस्तार असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, याच कारणामुळे पंतप्रधान मोदींनी मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतल्याचं सांगितलं जातंय. मंत्रिमंडळातील फेरबदलांमध्ये अनेक बड्या नेत्यांना वगळले जाण्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तार करताना भाजपकडून अनेक धक्कादायक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांना राज्यसभेत पाठवण्याऐवजी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. , असे संकेत मिळाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच याविषयीच्या चर्चांना सुरुवात झाली होती. आता समोर आलेल्या वृत्तानुसार, भाजपची एक महिला खासदार मोदी मंत्रिमंडळात मंत्री म्हणून सामील होऊ शकते. या खासदार १९९४ च्या बॅचच्या माजी आयएएस (IAS) अधिकारीही आहेत.

मंत्री होण्याची चर्चेत असणाऱ्या महिला खासदार कोण?

सूत्रांच्या माहितीनुसार, या महिला खासदार म्हणजे ओडिशामधील भुवनेश्वरच्या विद्यमान खासदार अपराजिता सारंगी. बिजू जनता दलाच्या अरूप पटनायक यांचा पराभव करून त्या २०२४ मध्ये खासदार बनल्या. त्या १९९४ च्या तुकडीतील (ओडिशा केडर) माजी आयएएस (IAS) अधिकारी आहेत.

२०१८ मध्ये भाजपमध्ये सामील होण्यासाठी त्यांनी आपली नोकरी सोडली आणि २०१९ मध्ये निवडणूक लढवली. अपराजिता सारंगी यांनी ओडिशा सरकारमध्ये विविध पदे भूषवली आहेत; त्यांनी शालेय आणि जनशिक्षण विभागाच्या सचिव म्हणूनही काम केले आहे. त्या मूळच्या बिहारमधील मुझफ्फरपूरच्या असून त्यांचा जन्मही तिथेच झाला होता.

अपराजिता सारंगी या भारतीय जनता पक्षाच्या एक प्रमुख राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणूनही काम पाहतात. यासह त्या 'घटनादुरुस्ती विधेयकांसाठीच्या संयुक्त समिती'सारख्या महत्त्वाच्या संसदीय समित्यांचे अध्यक्षपद भूषवत आहेत. २००९ ते २०१३ या काळात त्यांनी ओडिशा सरकारमध्ये शालेय शिक्षण, पंचायत राज आणि वस्त्रोद्योग विभागांचे सचिव म्हणून काम केले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या आगामी विस्तारात त्यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते. अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, सारंगी यांच्याकडे एखादे महत्त्वाचे मंत्रालय सोपवले जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. यासह मंत्रिमंडळात आणखी काही नवीन चेहऱ्यांना स्थान मिळण्याचीही चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

Ambernath : अंबरनाथमध्ये तरुणावर हल्ला, पुतणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून काकाने काढला राग; ५ आरोपींवर गुन्हा

Ketan Agarwal Case: केतन अग्रवालच्या हत्येआधीचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, सिया अन् चेतन होते सोबत

संजय दिना पाटील यांची पत्रकारांना शिवीगाळ; मुख्यमंत्री काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT