Mocha Cyclone Update
Mocha Cyclone Update Saam TV
देश विदेश

Mocha Cyclone Update: 'मोचा' चक्रीवादळ धडकणार! या तीन राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; हवामान खात्याचा अलर्ट

Satish Daud-Patil

Mocha Cyclone Latest Update: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्ट्याचं मोचा चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. हे वादळ आता उग्र रूप धारण करत पुढे पुढे सरकत आहे. मोचा वादळ पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर या आठवड्यातच धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (Latest Marathi News)

या वादळामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये पुढील तीन दिवसात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. मोचा चक्रीवादळ शुक्रवारी तीव्र रुप धारण करु शकतं, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने सोमवारी वर्तवला आहे. हवामान विभागाच्या मते या चक्रीवादाळाचा ताशी वेग १३० किलोमीटरपर्यंत असू शकतो.

महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा

मोचा चक्रीवादळाचा (Mocha Cyclone) परिणाम महाराष्ट्रात ही होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अवकाळीचं संकट ओढावलं आहे. पीकांचं यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याचे मते, मोचा चक्रीवादळ ११ मेपर्यंत मध्य बंगालच्या उपसागराच्या दिशेने उत्तर-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे ११ मे रोजी मध्य बंगालच्या उपसागरावर १२० किमी/प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. यानंतर मोका दिशा बदलून उत्तर-ईशान्य दिशेने सरकू लागेल. (Breaking Marathi News)

पुढे हे चक्रीवादळ बांगलादेश-म्यानमार किनारपट्टीजवळ मोका पोहोचेल. मात्र, बांगलादेश किनार्‍याकडे सरकल्याने ते अधिक धोकादायक होणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटांना आधीच अलर्टवर ठेवण्यात आले आहे. कारण चक्रीवादळाचा सध्याचा ट्रॅक हा बेटांच्या अगदी जवळ असल्याचा अंदाज आहे.

हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत काही भागात २० सेमीपेक्षा जास्त ‘अत्यंत मुसळधार’ पावसाचा इशारा दिला आहे. ही प्रणाली मजबूत झाल्यामुळे पूर्व-मध्य बंगालचा उपसागर, आग्नेय बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रातही समुद्राची स्थिती बिघडण्याची शक्यता आहे.

मच्छिमारांना सावधानतेचा इशारा

मंगळवारपासून लहान सागरी जहाजे आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. लोकांना किनारपट्टीवर न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 8 ते 12 मे दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांजवळील पर्यटन आणि जहाजबांधणीबाबत हवामान खात्याने अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Teeth Whitening Tips : पिवळेपणा जाऊन दात मोत्यासारखे चमकतील; आठवडाभर ट्राय करा 'या' पेस्ट

Nandurbar APMC Market: मिरचीचा ठसका! नंदुरबार बाजार समितीत विक्रमी आवक; ३५० कोटींची उलाढाल

Today's Marathi News Live : पती यशवंत यांनी ४३ वर्षे शिवसेनेला दिली, त्यांची पुण्याई माझ्यापाठी - यामिनी जाधव

Harry Potter Castle Viral Video : रशियाच्या हल्ल्यात हॅरी पॉटरचा राजवाडा जळून खाक, घटनेचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर

Sushma Andhare: मोठी बातमी! सुषमा अंधारेंना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश

SCROLL FOR NEXT