Missing Titanic Submarine: समुद्रात बुडलेल्या टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेली पाणबुडी बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे. उत्तर अटलांटिकमध्ये ही पाणबुडी बेपतात झाली असून तिचा शोध सुरू आहे. रविवारी ही पाणबुडी एका ब्रिटिश अब्जाधीशासह पाच प्रवाशांसह निघाली होती.
काही वेळाने या पाणबुडीशी संपर्क तुटला आणि ती कुठेतरी बेपत्ता झाली. तिला शोधण्याची मोहीम जोरात सुरू आहे. जसजसा वेळ जात आहे, तसतसा त्यात असलेल्या लोकांच्या जीव वाचवण्याच्या आशा कमी होत आहेत.
या पाणबुडीत चार प्रवासी आणि एक पायलट होता. या पाणबुडीमध्ये ७० ते ९६ तासांचा ऑक्सिजन साठवता येतो. अशा परिस्थितीत काळाच्या ओघात धोकाही वाढत आहे. २१ फूट उंचीच्या या पाणबुडीत चार दिवसांचा ऑक्सिजनचा साठा होता. आजचा तिसरा दिवस आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटन कंपनी ओशियनगेटच्या एका छोट्या पाणबुडीमधून पाच लोक टायटॅनिक जहाजाचे अवशेष पहाण्यासाठी रविवारी मध्य अटलांटिक महासागराच्या तळाशी जायला निघाले.
काही तासांनंतर या पाणबुडीचा संपर्क तुटला आणि तिचा तळाशी अपघात झाला की, काही तांत्रिक बिघाड झालाये, हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण या पाणबुडीसह त्यात असलेल्या पाच जणांच्या बचावाची मोहिम सुरु करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या कोस्टगार्डच्या माहितीनुसार, पाणबुडीनं महासागराच्या ताळाशी जायला निघाल्यानंतर १ तास ४५ मिनिटांत या पाणबुडीचा संपर्क तुटला. जिथं टायटॅनिक हे जगप्रसिद्ध जहाज बुडालं त्या ठिकाणी त्याचे अवशेष पर्यटकांना दाखवण्यासाठी महासागरात तब्बल ३८०० मीटर खोल ही पाणबुडी जाते. आठ दिवसांच्या या पर्यटन यात्रेचं तिकीट अडीच लाख अमेरिकन डॉलर अर्थात दोन कोटी रुपये इतकं असतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.