नात्‍याला काळीमा फासणारी घटना, अल्पवयीन मुलीवर बापासह 28 जणांनी केला बलात्कार Saam Tv
देश विदेश

नात्‍याला काळीमा फासणारी घटना, अल्पवयीन मुलीवर बापासह 28 जणांनी केला बलात्कार

काही वर्षात, स्वतः च्या अल्पवयीन मुलीवर अन्य २८ लोकांसह बलात्कार केल्याचा आरोप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ललितपूर : मागील काही वर्षात, स्वतः च्या अल्पवयीन मुलीवर अन्य २८ लोकांसह बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या अडचणी आणखी वाढ करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशच्या ललितपूर मधील एका १७ वर्षीय मुलीने तिच्या वडिलांसह समाजवादी पार्टी (सपा) आणि बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) नेत्याविरोधामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर २ दिवसांनी तिच्या आईने आता तिच्या पती विरोधात देखील तक्रार दाखल केली आहे.

बलात्कार पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, पतीने तिच्या पोटच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिला तिच्या सासरच्या लोकांसह घरगुती हिंसाचाराचा तिला बळी बनवलं आहे. महिलेने पती आणि सासरच्या लोकांबरोबरच आणखी ११ लोकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, वर्ष २००३ मध्ये पतीने तिच्या आई- वडिलांना औषध देऊन घरातून तिचे अपहरण करण्यात आले होते. त्याने तिचे सोन्याचे दागिने देखील घेतले होते. नंतर महिलेला जबलपूरला आणण्यात आले होते.

हे देखील पहा-

ज्या ठिकाणी तिचे नातेवाईकांच्या उपस्थितीत आर्य समाज मंदिरात जबरदस्तीने लग्न लावण्यात आले होते. महिलेने असा देखील दावा केला आहे की, लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तिच्या पतीने तिला सतत मारहाण आणि अत्याचार केले आहे. गर्भवती राहिल्यावर देखील तिला गर्भपात करण्यास सांगितले. मात्र, जेव्हा तिने नकार दिला तेव्हा तिच्या सासरच्यां लोकांनी तिला अन्न देणे बंद केले होते. शेजारी जेवण देत असत, ज्यामुळे तिचा जीव कसा तरी वाचला आहे.

मुलीला जन्म दिल्यावर तिच्यावर परत अत्याचार करण्यात आले आहेत. बलात्कार पीडितेच्या आईने दावा केला आहे की, जेव्हा ती परत गर्भवती राहिली, तेव्हा तिच्या पतीने तिच्या गुप्तांगाला इजा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तिच्या सासरच्या लोकांनी तिला रॉकेल पिऊन, विष देऊन आणि अॅसिड फेकून तिला मारण्याचा देखील प्रयत्न केला आहे, पण प्रत्येक वेळी ती वाचत गेली आहे. महिलेने तक्रारीत असे सांगितले आहे की, तिचा पती आपल्या मुलीला शाळेनंतर अनेक ठिकाणी घेऊन गेला आणि तिला विकण्याचा प्रयत्न करत व तिच्यावर बलात्कार करण्यात येत होते.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी महिलेचा पती, मेहुणी आणि सासूसह अनेकांजणाविरोधात कलम ४९८ ए, ३६६, ३२३, ५०६, ३२६, ३७७ आणि घरगुती हिंसाचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याशिवाय, पोलिसांनी एफआयआरच्या विरोधात निवेदन देण्याकरिता आलेल्या २०० बसपा आणि २५० एसपी कार्यकर्त्यांविरोधामध्ये २ एफआयआर देखील दाखल करण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

SCROLL FOR NEXT