I&B Ministry Twitter account hacked Saam Tv
देश विदेश

Ministry of Information and Broadcastingचे ट्विटर खाते हॅक; नाव ठेवले '𝐄ߋߊn ᛖʋsƙ'

आज बुधवारी सकाळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले होते. हॅकर्सने प्रोफाईल फोटोवर 𝐄ߋߊn ᛖʋsƙ असे नाव देऊन माशाचे चित्र टाकले होते.

वृत्तसंस्था

दिल्ली : बुधवारी सकाळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे (I&B Ministry) ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले आहे. हॅकर्सने प्रोफाईल फोटोवर 𝐄ߋߊn ᛖʋsƙ असे नाव देऊन माशाचे चित्र टाकले होते. यासोबतच गेल्या काही दिवसांत अनेक ट्विटही करण्यात आले. काही वेळाने अकाऊंट रिस्टोअर करण्यात आले आणि त्यावरील ट्विटही काढून टाकण्यात आले. (I&B Ministry Twitter account hacked)

असा तर्क लावण्यात येत आहे की, हे हॅकर्स तेच असू शकतात ज्यांनी यापूर्वी पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाउंट हॅक केले होते. कारण त्यावर तोच मजकूरमध्ये साम्य पाहायला मिळत आहे जो तेव्हा दिसला होता. यापूर्वी ICWA, IMA आदींचे ट्विटर अकाउंटही हॅक करण्यात आले होते.

I&B Ministry Twitter account hacked

सूत्रांनी स्पष्ट केलं आहे की, कदाचित पासवर्डची तडजोड झाली आहे किंवा हॅकिंगशी संबंधित लिंकवर क्लिक करण्यात आले आहे. हे खाते हाताळणाऱ्या एखाद्याने केले असावे. नंतर CERT म्हणजेच इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने खाते रिस्टोर केले. खाते रिस्टोर झाल्याची माहिती आयटी मंत्रालयाच्या (IT Ministry) खात्यातून देण्यात आली. (I&B Ministry Twitter account hacked news in marathi)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Odor:आंघोळ करूनही घामाचा वास येतोय? या नैसर्गिक उपायांनी मिळवा ताजेतवानेपणा

Garlic Peeling: लसूण सोलण्यासाठी घरच्या घरी वापरता येतील अशा सोप्या पद्धती

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

SCROLL FOR NEXT