Bhagwat Karad  Twitter/ @ANI
देश विदेश

Bhagwat Karad On Budget: अर्थ राज्यमंत्री भागवत कराडांचं बजेटआधी मोठं वक्तव्य, सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं आश्वासन

India Budget 2023 expectations: आजच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला काय मिळणार?

वृत्तसंस्था

Bhagwat Karad On Union Budget 2023 : देशाचा अर्थसंकल्प आज सकाळी 11 वाजता सादर होणार आहे. देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत आज अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी यात मोठ्या घोषणांची सर्वांना अपेक्षा आहे.

केंद्र सरकार देशातील आम जनतेला काय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण संसदेत पोहोचल्या आहेत. तर अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड हे देवपूजा करूनच संसदेत पोहोचले. याआधी भागवत कराड यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आजच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला काय मिळणार? असा सवाल भागवत कराड यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना कराड म्हणाले, जनतेला या अर्थसंकल्पातून काय मिळणार हे तुम्हाला 11 वाजता कळेल. तूर्तास मी कोणत्याही गोष्टीवर बोलणार नाही. 11 वाजता बजेट सादर होणार असून त्यातून सर्व गोष्टी स्पष्ट होणार आहे असं भागवत कराड म्हणाले.

बजेटपूर्वी मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहे. त्यानंतर कॅबिनेट बैठक होईल. नंतर आज 11 वाजता अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, भागवत कराड (Bhagwat Karad) हे संसदेत पोहोचले. संसदेत त्यांनी निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांची भेट घेतली. त्यानंतर हे दोन्ही नेते राष्ट्रपती भवनाकडे रवाना झाले आहेत.

कोविड १९ महामारीनंतर आता भारत सावरलाय असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हटलं. आर्थिक पाहणी अहवाल जर बघितला तर सर्वच क्षेत्र प्रगतीपथावर आहेत. २०१४ मध्ये १० व्या स्थानी असलेली भारतीय अर्थव्यवस्था आजघडीला पाचव्या स्थानी आहे असे देखील भागवत कराड म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT