देश विदेश

भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

uttar pradesh crime : भाजप मंत्र्याच्या मुलाने कारने अनेकांना उडवल्याची घटना घडली. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला.

Vishal Gangurde

मंत्र्याच्या मुलाचा धक्कादायक अपघात

मंत्र्याच्या मुलाने दुचाकीस्वारासह तिघांना कारने चिरडलं, एकाचा मृत्यू

अपघातानंतर पिस्तुल दाखवून स्थानिक नागरिकांना धमकी

उत्तर प्रदेशच्या ललितपूरमध्ये जाखलौन पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी राज्यमंत्र्यांच्या मुलाने दुचाकीस्वारासहित तिघांना चिरडले. या दुर्घटनेत एकाच मृत्यू झाला आहे. तर दोन ग्रामस्थ गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी एकच गर्दी झाली.

अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमले. त्यावेळी या मुलाने कारची काच फोडून पळ काढला. पोलिसांनी राज्यमंत्र्याच्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करून कार ताब्यात घेतली. ही कार राज्यमंत्री मनोहरलाल पंथ यांच्या पत्नीच्या नावावर आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कारवाईला सुरुवात झाली आहे.

नेमकं काय घडलं?

२१ वर्षीय शिवेंद्र, ५० वर्षीय शंकर सिंह, १९ वर्षीय अनुज रतीराम गावातील एका मंदिराच्या कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर दुचाकी सुरू करत होते. त्याचवेळी ललितपूरला जाणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला चिरडलं. कारवर आमदार असल्याचे लिहिलं होतं. अपघातानंतर स्थानिक नागरिक मदतीला धावले. लोकांनी कारमध्ये असलेल्या राज्यमंत्री मनोहरलाल यांचा मुलगा नरेशला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु लोकांना चकवा देऊन त्याने घटनास्थळावरून पळ काढला.

नरेश सिंहने यावेळी स्थानिक नागरिकांवर पिस्तुल ताणली. लोकांना जीवे मारण्याची धमकी देऊन पळ काढला. या घटनेत तीन व्यक्ती गंभीर जखमी झाले. यात शिवेंद्र नावाच्या युवकाचा मृत्यू झाला. तर शंकर आणि अनुजला प्राथमिक उपाचारानंतर झाँसी येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. मृत शिवेंद्रचे काका राजपाल यांच्या तक्रारीवरून मंत्र्याच्या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नरेश सिंह अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्याच्यावर काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

नागपूरनंतर सोलापुरात बनावट नोटांचा सुळसुळाट; पोलिसांकडून विक्री करणारी टोळी जेरबंद, अशी अडकली जाळ्यात

SCROLL FOR NEXT