us iran israel war Saam tv
देश विदेश

इराणच्या निशाण्यावर थेट युएई; ट्रम्पच्या नादात आखात जळणार? VIDEO

us iran israel war : अमेरिकेला मदत करणं युएईला आता चांगलचं भोवणार आहे... कारण आता इराणच्या निशाण्यावर थेट युएई आहे... त्यामुळे इराण- अमेरिका संघर्षात आखाती युद्धाचा भडका कसा उडणार... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Snehil Shivaji

इस्रायलला साथ देत अमेरिकेनं इराणवर हल्ला चढवला. पण निकरानं लढून इराणनं जगाची महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर देऊन जेरीस आणलंय. आता या युद्धात ज्यांनी अमेरिकेला मदत केली ते देश इराणच्या निशाण्यावर आलेत. आणि त्यात प्रामुख्यानं युएईतील दुबई अबूधाबी सारखी शहरं लक्ष्य होतील अशी उघड उघड धमकीचं इराणं दिली. कारण अमेरिकेनं इराणमध्ये सैनिक घुसवण्याचा इशारा दिल्यानंतर इराण आता खवळलाय

जर आमच्यावर जमिनीवरून हल्ला झाला, तर सर्वात आधी UAEउद्ध्वस्त करू. अमेरिका आणि इस्रायलला UAE आपलं लष्करी तळ आणि हवाई हद्द वापरू देतंय. आता हल्ला झाला तर कवेळ लष्करी तळच नव्हे तर युएईतील सरकारी ऑफिसेस, बिझनस सेंटर्स नष्ट करण्याचा निर्वाणीचा इशारा दिलाय.

अमेरिकेपासून इराण १० ते १२ हजार किलोमीटर दुर आहे. त्यामुळे इराण विरोधात लढण्यासाठी अमेरिकेनं सौदी, युएई, कतार सारख्या आखाती देशांची लष्करी तळं वापरली. आणि आता हीच तळं उडवून देण्याची धमकी इराणनं दिलीय. यापूर्वीच अमेरिकेनं खार्ग आणि केशम बेटांवर केलेल्या हल्ल्याचा इराणनं यूएईच्या अबुधाबीत हबशान गॅस प्लांट उडवून बदला घेतलाय.

त्यामुळे आता जखमी इराण आपले हल्ले केवळ यूएईपुरतेच नव्हे तर अमेरिकेला मदत करणाऱ्या शेजारील सौदी अरेबिया, कतार, बहारीन या आखाती राष्ट्रांवरही हल्ले चढवायला मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे पुढच्या काळात आखाती राष्ट्रांमध्येच युद्धाचा भडका उडण्याची मोठी भीती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT