Satya Nadella Saam Tv
देश विदेश

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या मुलाचे वयाच्या 26 व्या वर्षी निधन !

मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या कार्यकारी कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे सांगितले की सीईओ सत्या नडेला यांचा मुलगा झैन यांचे निधन झाले आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांच्या मुलाचे दुःखद निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नडेला यांचा २६ वर्षीय मुलगा जेनला जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी (Cerebral palsy) हा आजार होता. त्याचवेळी मायक्रोसॉफ्टकडून मिळालेल्या माहितीनुसार जेन यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. (Zain Nadella Dies)

त्याच वेळी, मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या कार्यकारी कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे सांगितले की सीईओ सत्या नडेला यांचा मुलगा झैन (Zain Nadella) यांचे निधन झाले आहे. संदेशात अधिकाऱ्यांना त्याच्या कुटुंबासाठी प्रार्थना करण्यास देखील सांगितले.

सत्या नाडेला दीर्घकाळापासून मायक्रोसॉफ्टशी जोडले गेले आहेत. ते 1992 मध्ये एक इंजिनिअर म्हणून कंपनीत रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी एवढी प्रगती केली आणि आज त्याच कंपनीच्या चेअरमनपदापर्यंत ते पोहोचले आहेत.

भारतीय वंशाचे सत्या नाडेला यांचे करिअर आणि जीवन असे आहे की प्रत्येक तरुण त्यांच्यापासून प्रेरणा घेतो. नडेला यांचा स्वप्नवत प्रवासही बहुतांश भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. हे सर्व त्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ आहे की, आज ते जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीचे सीईओ आहेत. तसेच ते अमेरिकेतील एक मोठे व्यक्तिमत्व आहे. तसेच, त्यांचे वार्षिक उत्पन्न 300 कोटींहून अधिक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Video : मुसळधार पावसात प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारवर झाड कोसळले, थोडक्यात जीव वाचला

Maharashtra News Live Update: मुंबईसह पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट

Uddhav Thackeray : मध्यरात्री शिंदेंचं ऑपरेशन टायगर अन् ठाकरेंना जोरदार धक्का, बड्या नेत्याचा शिवसेनेत तडकाफडकी प्रवेश

लातूर हादरले! पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले; अमानुष कृत्यामागील कारण वाचून चीड येईल

Belapur Tourism : पावसाळ्यात मरीन ड्राईव्ह फिरून कंटाळलात? मग बेलापूरजवळील 'हा' समुद्रकिनारा एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT