मेक्सिको आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mexico International Airport) ग्वाटेमाला उड्डाण करण्याच्या तयारीत होतं. प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत बचावाचे नियम समजावून सांगितले जात होते. तेव्हा अचानक एका प्रवाशाने विमानाचे इमर्जन्सी गेट उघडले आणि तो बाहेर गेला. तो विमानाच्या पंखावर चालू लागला. हे करत असताना त्याच्या मित्रानं त्याला प्रोत्साहन दिलंय. मात्र, इतर प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. (Maharashtra News)
या व्यक्तीला विमानाच्या पंखावरून चालताना पाहून इतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. क्रू मेंबर्समध्येही घबराट पसरली होती. त्यांनी तात्काळ इंजिन बंद करून सुरक्षा रक्षकाला बोलावून प्रवाशाला तात्काळ आत ओढले. यानंतर त्याला आणि त्याच्या मित्रालाही विमानातून खाली उतरवण्यात आलं. पोलिसांनी दोघांनाही पकडून पोलीस ठाण्यात नेलं. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मेक्सिको सिटीमधील घटना
मिळालेल्या माहितीनुासार ही घटना मेक्सिको सिटीमध्ये घडली आहे. मेक्सिको सिटी आंतरराष्ट्रीय विमानतळाने या घटनेचं (Passenger Walked On Plane Wings) स्पष्टीकरण देणारं निवेदन जारी केलंय. 25 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे.
त्यानं विमानाचं कोणतंही नुकसान केलं नाहीये. पण त्याची ही कृती पाहून प्रवासी संतापले. त्या व्यक्तीने त्याच्या कृत्याचा व्हिडिओ बनवला. फोटोही क्लिक केलेत. यानंतर सुरक्षा रक्षकाला बोलावून त्यांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले. तसंच, प्रवाशांनी त्या व्यक्तीविरोधात पोलिसांकडे लेखी तक्रार दिलीय.
तांत्रिक बिघाडामुळे विमानाला उशीर
ग्वाटेमाला सिटीला जाणारं फ्लाइट AM672 गुरुवारी 4 तास 56 मिनिटे उशिरानं आलं. प्रवासी विमानात चढले होते, मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमानाला उशीर झाला. अशा परिस्थितीत विमान कंपनीनं प्रवाशांना वेंटिलेशन आणि पाण्याविना 5 तास थांबायला लावलं होतं.
व्हिडिओमध्ये प्रवासी स्वत:ला पंखा लावताना आणि फ्लाइट अटेंडंटकडून पाणी मागताना दिसत आहेत. त्यामुळे थोडी हवा आत (Passenger Walked On Plane Wings) यावी. प्रवाशांना दिलासा मिळावा, म्हणून त्याला अशी कारवाई करावी लागली. त्यामुळे त्याला आपल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. कायदेशीर कारवाईसाठी तो तयार आहे, असं त्यानं सांगितलं आहे. प्रवाशांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्याने आमचे प्राण वाचवले, असं प्रवाशांनी सांगितलंय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.