SIA, Tata to merge Air India, Vistara Saam TV
देश विदेश

Tata Group News: टाटा समूहाचा मोठा निर्णय; २०२४ पर्यंत Air India आणि Vistara एअरलाईन्सचे होणार विलीनीकरण

SIA, Tata to merge Air India, Vistara: 1932 मध्ये टाटा समूहानेच एअर इंडिया सुरू केली होती. जे. आर. D. टाटा (JRD Tata) यांनी सर्वप्रथम टाटा एअरलाइन्सचा पाया रचला होता.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

SIA, Tata to merge Air India, Vistara: टाटा उद्योग समूहाने मोठी घोषणा केली आहे. टाटा समूहाची एअर इंडिया आणि विस्तारा या दोन एअरलाईन्स कंपन्यांचं विलीनीकरण करण्यात येणार आहे. २०२४ पर्यंत टाटा समूहातील एअर इंडिया आणि विस्तारा या कंपन्यांचं विलीनीकरण करण्यात येणार आहे. (Tata Group Latest News)

याच वर्षी एअर इंडिया (Air India) कंपनी भारत सरकारकडून पुन्हा टाटा समूहाकडे आली होती. विस्तारा एअरलाइन्स ही टाटा समूहाच्या (Tata Group) सह-मालकीची कंपनी आहे. सिंगापूर एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे की त्यांनी आणि टाटा सन्सने आता विस्तारा एअरलाइन्स एअर इंडियामध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. विस्ताराच्या विलीनीकरणानंतर, एअर इंडिया ही देशातील सर्वात मोठी पूर्ण वाहक एअरलाइन्स असेल, जी देशासह जगभरात सेवा देईल.

AirAsia India देखील Air India मध्ये होणार विलीन

विस्तारा आणि एअर इंडिया व्यतिरिक्त, टाटा समूहाकडे एअर एशिया इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस एअरलाइन्स देखील आहेत. कंपनीने 2024 पर्यंत AirAsia India ला Air India Express मध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे कंपनीचे चारही एअरलाईन्स ब्रँड एकाच मोठ्या ब्रँड एअर इंडियाच्या अंतर्गत येतील.

18,000 कोटींना खरेदी केली एअर इंडिया

एअर इंडियाचे अधिग्रहण करण्याचा करार 18,000 कोटी रुपयांमध्ये पूर्ण झाला. हा करार जानेवारी २०२२ मध्ये पूर्ण होऊ शकतो. टाटाने एअर इंडियासाठी दिलेल्या किंमतीमध्ये एअर इंडियावरील एकूण कर्जाच्या 15,300 कोटी रुपयांचा समावेश होता.

एअर इंडियाचे टाटा समूहाकडे जाणे 'होम कमिंग' म्हणून पाहिले जात होते. कारण 1932 मध्ये टाटा समूहानेच एअर इंडिया सुरू केली होती. जे. आर. D. टाटा (JRD Tata) यांनी सर्वप्रथम टाटा एअरलाइन्सचा पाया रचला होता. नंतर त्याचे नाव बदलून एअर इंडिया करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर, जेव्हा भारतातून सामान्य हवाई सेवा सुरू झाली तेव्हा एअर इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बनली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

SCROLL FOR NEXT